मोठी बातमी : साताऱ्यात शिंदे विरूद्ध भोसले लढत होणार; भाजपकडून उदयनराजे भोसले यांना उमेदवारी
BJP Announced Udayanraje Bhosle Name For Satara Loksabha : साताऱ्यासाठी महायुतीकडून अखेर उदयनराजे भोसलेंना (Udayanraje Bhosle) उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. त्यामुळे आता साताऱ्यात मविआचे शशिकांत शिंदे विरूद्ध उदयनराजे भोसले अशी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
BJP releases its 12th list of candidates for the Lok Sabha elections.
#LokSabaElection2024 pic.twitter.com/DihIkG6caV
— ANI (@ANI) April 16, 2024
उमेदवारीपूर्वीच फोडला प्रचाराचा नारळ
साताऱ्यातून उदयनराजे भोसले यांचे नाव महायुतीचे उमेदवार म्हणून जवळपास निश्चित मानले जात होते. पण त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा होत नव्हती त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या जात होत्या. मात्र आज (दि.16) अखेर साताऱ्यातून भोसले यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. विशेष म्हणजे भोसले यांनी त्यांची उमेदवारी घोषित होण्यापूर्वीच प्रचाराला सुरूवात केली होती. तसेच मोठं शक्ती प्रदर्शनदेखील केले होते. मात्र, त्यांचे नाव घोषित केले जात नव्हते. मात्र, आता महायुतीकडून उदयनराजे भोसले यांचे नाव घोषित करण्यात आले असून, सातारा लोकसभेसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे विरूद्ध उदयनराजे भोसले यांच्या थेट लढत होणार आहे.
कदम-पाटील आक्रमक पण, थोरात पटोलेंचा समजावणीचा सूर; चार वक्तव्यांत दिसला सांगलीचा ‘मूड’
आजच्या यादीत फक्त उदयनराजे भोसलेंचेचं नाव
भाजपकडून आज लोकसभेसाठीची 12 वी यादी जाहीर करण्यात आली आहे. यात पंजाब, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगालसह महाराष्ट्रासाठीचे उमेदवार जाहीर करण्यात आल आहे. विशेषबाब म्हणजे जाहीर करण्यात आलेल्या यादीत महाराष्ट्रातून उदयनराजे भोसले यांचे एकमेव नाव आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता उदयनराजे भोसले 18 एप्रिल रोजी अर्ज भरण्याची शक्यता आहे. भोसले यांनी दोन दिवसांपूर्वी उमेदवारी अर्ज घेतला होता.
छ.संभाजीनगरात CM शिंदे भाजपची चाल खेळणार; वाढदिवसाच्या शुभेच्छांमागून उमेदवाराची चाचपणी
उमेदवारी बद्दल कोणतीही शंका नव्हती – उदयनराजे भोसले
भाजपने उदयनराजे यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर पहिल्यांदाच प्रसार माध्यमांची बोलताना उदयनराजे यांनी आनंद व्यक्त केला. मात्र ज्या गावांमध्ये ते होते त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. तिकीट मिळाल्याचा आनंद व्यक्त करत असताना उदयनराजे भोसले यांनी 18 तारखेला मोठ्या ताकतीने फॉर्म भरणार असल्याचे सांगत असताना त्यांच्यावर शरद पवारांनी केलेल्या आरोपांचं खंडन करत असताना त्यांनी शरद पवारांवरही टीका केली. त्यांनी ज्यांना उमेदवारी दिलेली आहे त्यांनी केलेला कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार चारावर त्यांनी कालच्या पत्रकार परिषदेमध्ये का सांगितले नाही असा खडा सवाल करत त्यांनी शरद पवारांनी नैतिकता सांगू नये असे ते म्हणाले.
Sangli Lok Sabha : …तर मी उमेदवारी मागे घेण्यास तयार; चंद्रहार पाटलांचे मोठे विधान
शशिकांत शिंदे हे म्हणाले होते आरोप जर सिद्ध झाले तर मी फॉर्म भरणार नाही आता त्यांनी फॉर्म भरलेलाच आहे तर फॉर्म काढून घेण्याचा तारखे अगोदर यांनी नैतिकता दाखवत फॉर्म काढून घ्यावा. शरद पवारांना उदयनराजेंनी खुलं आव्हान देत जर माझ्यावर एखादा भ्रष्टाचाराचा आरोप दाखवला तर मी 18 तारखेला फॉर्म भरणार नाही आणि जर फॉर्म काढून घेण्याच्या तारखे अगोदर जर भ्रष्टाचार दाखवला तर त्या वेळेपर्यंत ही मी फॉर्म काढून घेईल असे देखील ते म्हणाले.