४ हजार कोटींचा घोटाळा केला असता तर आज भाजपमध्ये असतो; शशिकांत शिंदेंचा टोला

४ हजार कोटींचा घोटाळा केला असता तर आज भाजपमध्ये असतो; शशिकांत शिंदेंचा टोला

Shashikant Shinde on MLA Mahesh Shinde : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Bombay Agricultural Produce Market Committee) तत्कालीन संचालकांनी शेतकऱ्यांसाठी आरक्षित भूखंडावर बांधकाम करून विकले, हा ४ हजार कोटींचा घोटाळा असल्याचा आरोप आमदार महेश शिंदेंनी (Mahesh Shinde) शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांच्यावर केला होता. त्यावर आता शशिकांत शिंदेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. हजारो कोटींचा घोटाळा केला असता तर मी आज भापजमध्ये गेलो असतो, असा पलटवार शशिकांत शिंदेंनी केला.

शिर्डी लोकसभेची लढाई धनशक्ती विरुध्द जनशक्ती; उत्कर्षा रूपवतेंचा आजी-माजींवर हल्लाबोल 

शशिकांत शिंदे म्हणाले, निवडणुकीच्या तोंडावर आरोप-प्रत्यारोप होतील. माझ्या उमेदवारीमुळं त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळं असे आरोप केले जात आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत मी चार हजारो कोटींचा घोटाळा केला असता तर मी आज भापजमध्ये गेलो नसतो का, असा टोला शशिकांत शिंदेंनी लगावला. माझ्याकडून कोणताही घोटाळा झाला नाही, असंही शिंदे म्हणाले.

हिंदुत्व सोडलंय, गाण्यात जय भवानी का आणावं; देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर पुन्हा वार 

ते म्हणाले, आमदार महेश शिंदे हे यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराच्या चौकटीत बसतात का, हा माझा पहिला प्रश्न आहे. हा यशवंत विचाराचा असलेला जिल्हा अशा लोकांच्या हातात जाऊ नये, म्हणून माझी उमेदवारी दिली आहे. यशवंतराव चव्हाण यांच्या विचारसरणीच्या चौकटीत आम्ही 100 टक्के काम करत आहोत. हा छत्रपती शिवाजी महाराज, यशवंतराव चव्हाण, सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारा पुरोगामी जिल्हा आहे. सातारकरांनी कायमच पुरोगामी विचारांची पाठराखन केली. यावेळीही कोणी कितीही प्रचार-अप्रचार करू द्या, पुरोगामी विचारांची पाठराखन सातारकर करतील, असा विश्वास शशिकांत शिंदेंनी व्यक्त केला.

आमदार महेश शिंदे यांनी शरद पवार यांच्यावरही टीका केली होती. त्यावरही शशिकांत शिंदेंनी भाष्य केलं. टीका करणाऱ्यांनी लायकीत राहावं. हा सातारा जिल्हा पवारांवर कोणी टीका केली तर इतिहास घडवतो. पवार यांच्यावर टीका केल्यावर काय होते, हे अख्ख्या महाराष्ट्राने पाहिले आहे, बापाला विसरण्याची पध्दत काही लोकांकडे, त्यामुळं मी त्यांच्यकडून जास्त अपेक्षा करणार नाहाी. मी सर्व सहन करेन, पण शरद पवारांबद्दल बोलल्यास जशास तसं उत्तर देईल, असा इशाराही शशिकांत शिंदेंनी दिला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज