बीड : महिन्याभरापूर्वी आयकरची धाड अन् आज भाजप प्रवेश : उद्योगपतीच्या राजकीय टायमिंगची चर्चा

  • Written By: Published:
बीड : महिन्याभरापूर्वी आयकरची धाड अन् आज भाजप प्रवेश : उद्योगपतीच्या राजकीय टायमिंगची चर्चा

suresh kute joins bjp : बीडच्या कुटे ग्रुपचे प्रमुख सुरेश कुटे (Suresh Kute हे गेल्या काही दिवसांपासून भाजपमध्ये (BJP) प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. आज अखेर त्यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रेवश केला आहे. त्यांच्यै पक्षप्रवेशामुळं जिल्ह्यात भाजपची ताकद आणखी वाढणार आहे.

Post Office Recruitment 2023: दहावी, बारावी उत्तीर्णांना पोस्ट खात्यात नोकरीची संधा, पगार 81 हजार रुपये महिना 

दिवाळीनंतर नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत सुरेश कुटे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. मात्र, त्यांनी घाईघाईने भाजपमध्ये प्रवेश केल्याचे दिसत आहे. यावेळी द कुटे उद्योग सुमहाच्या कार्यकारी संचालिका अर्चना कुटे यांनीही भापजमध्ये प्रवेश केला. कोराडी (नागपूर) येथील बावनकुळे यांच्या जनसंपर्क कार्यालयात शेकडो समर्थकांसह कुटेंनी भाजपमध्ये प्रवेश केला.

यावेळी भाजप प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार अमर साबळे, माजी आमदार शवंत कुलकर्णी, राजेश शुक्ला, प्रिन्स त्यागी, शिवाजीराव पारसकर, नवनाथ प्रभाळे, शेख शेरू पटेल, बबनराव लवटे, दगडू कानडे, शिवाजी घरत, गणेश वाघमारे, बबन वाघमारे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते

Video : ‘मी मुख्यमंत्र्यांचंही ऐकत नसतो, सांगेल ते करायचे’; सत्ताधारी मंत्र्यांचा भलताच कॉन्फिडन्स 

कुटे उद्योग समूहाने फार कमी कालावधीत उद्योग क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे. तिरुमला हा तेलाच्या क्षेत्रातील अग्रगण्य ब्रॅंड कुटे ग्रुपने तयार केला आहे. कापड दुकानांपासून ते 19 कंपन्यांचा 17 हजार कोटी रुपयांची संपत्ती असलेल्या कुटे ग्रुपने २५ हजार तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला.

गेल्या महिन्यात कुटे ग्रुपच्या अनेक उद्योगांवर आयकर विभागाने एकाच वेळी छापे टाकले होते. आयकर विभागाने छापा टाकताच कुटे यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या ज्ञानराधा बँकेतून ठेवी काढण्यासाठी ठेवीदारांनी गर्दी केली होती. महाराष्ट्रातील सर्व शाखांमध्ये एकाच वेळी ठेवीदारांमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.या सर्व अडचणींवर मात करण्यासाठी कुटे गट विविध प्रयत्न करत होते.

आयकर विभागाने छापे टाकले तेव्हापासून संपूर्ण राज्यात कुटे ग्रुपची चर्चा होत आहे. अशातच आज कुटे ग्रुपचे सर्वसर्वा ससलेल्या सुरेश कुटे यांनी भाजपात प्रवेश केल्यानं राज्याच्या राजकीय वर्तृळात एकच खळबळ उडाली आहे कुटे यांनी कायम राजकारणापासून दूर राहणेच पसंत केले. मात्र, आयकर विभागाच्या कारवाईंना वैतागून त्यांनी भाजपात प्रवेश केल्याचं बोलल्या जातं.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube