Madha Loksabha : मोहिते पाटील अन् शरद पवारांची दिलजमाई; प्रविण गायकवाडांनी सांगितलं A To Z

Madha Loksabha : मोहिते पाटील अन् शरद पवारांची दिलजमाई; प्रविण गायकवाडांनी सांगितलं A To Z

Dhairyashil Mohite Patil : लोकसभा निवडणुकीचं (Loksabha Election) सर्वत्र वातावरण तापलं आहे. सर्वच पक्षांकडून सत्ता खेचण्यासाठी रणनीती आखली जात आहे. अशातच सोलापूरातील माढा लोकसभा मतदारसंघात (Madha Loksabha) निवडणूक लढवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (Sharad Pawar) गटाने उमेदवार शोधला आहे. आधीच्या काळात राष्ट्रवादीत असलेलं मोहिते पाटील घराणं शरद पवार गटाकडून माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे. धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyashil Mohite patil) हे महाविकास आघाडीचे उमदेवार असल्याचं बोललं जात आहे. मागील निवडणुकीच्या काळात शरद पवारांची साथ सोडून आता पुन्हा एकदा मोहिते पाटील आणि पवारांमध्ये दिलजमाई झाली असल्याचं दिसून येत आहे. याबाबत संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रविण गायकवाड (Pravin Gaikwad) यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना थेटपणे भाष्य केलं आहे.

कॉंग्रेस नेतृत्वाला ग्राउंड रिॲलिटीचे भान नसल्यानेच १७ जागा…; अशोक चव्हाणांची टीका

छत्रपती शाहु महाराजांनी कोल्हापुरात महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. शरद पवारांच्या विचारांसाठीच आपण निवडणूक लढवत असल्याचं शाहू महाराजांनी यावेळी स्पष्ट केलं होतं. त्यामुळेत शाहू महाराज विचारांसाठी निवडणूक लढवत आहेत. तर सोलापूरचे विजयसिंह मोहिते पाटील हे शाहू महाराजांचे व्याही आहेत. त्यानंतर घरांत चर्चा झाल्यानंतर आपण स्वाभिमानासाठी शरद पवार यांना अशा संघर्षाच्या काळात साथ दिली पाहिजे, असा निर्णय झाला. विजयसिंह मोहिते पाटील आणि शरद पवार यांचे अत्यंत जवळचे संबंध आहेत. त्यामुळे दोन्ही घराण्यांनी स्वाभिमानासाठी शरद पवार गटाकडून लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असल्याचं प्रविण गायकवाड यांनी सांगितलं आहे.

सांगलीत ‘पिक्चर अभी बाकी है’ : विशाल पाटलांच्या बंधूंनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट

शरद पवारांना पाहुन विजयसिंह मोहिते पाटील भावूक झाले होते…
सांगोल्यात एका कार्यक्रमानिमित्त शरद पवार सोलापुरात आले होते. त्यावेळी विजयसिंह मोहिते पाटील आजारी असल्याने त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी शरद पवार विजयसिंह मोहिते यांच्या निवासस्थानी आले होते. त्यावेळी दोघांमध्ये चर्चा झाली. या चर्चेदरम्यान, 84 व्या वर्षीही शरद पवार संघर्ष करत असल्याचं पाहून विजयसिंह मोहिते पाटील भावूक झाले होते. जर विजयसिंह मोहिते पाटलांची तब्येत चांगली असते तर तेच शरद पवारांसाठी मैदानात उतरले असते, असंही प्रविण गायकवाडांनी सांगितलं आहे.

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपमध्ये गेले अन् आमदार झाले पण विजयसिंह मोहिते हे राष्ट्रवादीतच राहिले त्यांनी पक्ष सोडला नाही. रणजितसिंह मोहिते जरी भाजपात असतील तरीही कुटुंबातील इतर लोकं शरद पवारांच्याच विचारसरणीचे आहेत. या घराण्याचा विचार फुले-शाहू-आंबेडकरांचा असल्याचंही गायकवाड यांनी सांगितलं आहे.

निंबाळकरांना निवडून आणलं आता विरोधात…
मागील निवडणुकीत भाजपचे उमदेवार रणजितसिंह निंबाळकर निवडून आले होते. निंबाळकरांच्या विजयामध्ये मोहिते घराण्याचा सिंहाचा वाटा आहे. कारण निंबाळकरांना मोहिते पाटलांमुळेच मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळालं होतं. विजयसिंह मोहिते पाटलांना शेतकऱ्यांसाठी भीमा-कृष्णा नदीला एकत्र आणून पाण्याचा प्रश्न सोडवायचा आहे. विद्यमान खासदारांनी मोहिते पाटलांचं राजकारण अडचणीत आणलं असून त्यासाठीच स्वाभिमानासाठी लढण्याचा निर्णय मोहिते पाटलांनी घेतला आहे

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

वेब स्टोरीज