कॉंग्रेस नेतृत्वाला ग्राउंड रिॲलिटीचे भान नसल्यानेच १७ जागा…; अशोक चव्हाणांची टीका
Ashok Chavan on Congress : लोकसभेसाठी (Lok Sabha Elections) महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) जागावाटपं निश्चित झालं. शिवसेना ठाकरे पक्ष 21, काँग्रेस 17 जागांवर आणि शरद पवार गट 10 जागांवर निवडणूक लढवणार आहे. दरम्यान, आता भाजप नेते आणि राज्यसभा खासदार अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी महाविकास आघाडीतील जागावाटपावरून कॉंग्रेसवर घणाघाती टीका केली.
दिलजीत दोसांझचा ‘जोडी तेरी मेरी’ आता ओटीटीवर; कधी, कुठे, कसा, जाणून घ्या…
आज माध्यमांशी बोलतांना चव्हाण म्हणाल की, ग्राउंड रिॲलिटीचे भान नेतृत्वाला नसल्यामुळे काँग्रेसला महाविकास आघाडीत केवळ १७ जागांवर समाधान मानावे लागले. काँग्रेसची एवढी बिकट परिस्थिती यापूर्वी कधीच नव्हती. उद्धव ठाकरे किंवा शरद पवार यांच्यासमोर काँग्रेस नेत्यांना आपली बाजू प्रभावीपणे मांडता येत नाही. त्यामुळे त्यांच्यावर आता जागा गमावण्याची वेळ आली आहे, अशी टीका चव्हाण यांनी केली.
‘कॉंग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढा’; पटोलेंची ऑफर ठाकरेंच्या नेत्यांने धुडकावली
पुढं ते म्हणाले, सर्वच जागा निवडून येऊ शकत नाहीत. मात्र, काँग्रेसने भिवंडी आणि सांगली या पारंपरिक जागा सोडून दिल्याचं आश्चर्य वाटतं, असंही चव्हाण म्हणाले.
मतदारसंघाचा अभ्यास असला पाहिजे
ते म्हणाले, त्यांचा समन्वय कोण साधते मला माहिती नाही. मात्र त्यांचं जे काही चाललंय, त्यामुळे कार्यकर्ते नाराज आणि अस्वस्थ आहेत. जागांचा विचार करतो, तेव्हा आपला प्रभाव पडला पाहिजे. मतदारसंघाचा अभ्यास असला पाहिजे, असा टोलाही चव्हाण यांना लगावला. काँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षाला केवळ 17 जागांवरच थांबावं लागले, याचा विचार केला पाहिजे. काँग्रेसमध्ये गटबाजी वाढलेली आहे, असंही चव्हाण म्हणाले.
नाना पटोले यांच्या कारचा भीषण अपघात झाला. हा अपघात नसून घातपात असल्याची टीका कॉंग्रेसने केली. यावरही चव्हाण यांनी भाष्य केलं. ते म्हणाले की, अपघात होणं मी समजू शकतो. रोज अपघात होत असतात. ते होऊ म्हणून प्रत्येकजण प्रयत्न करतो. अपघात होणे ही गंभीर बाब आहे. मात्र, घातपातामुळं अपघात झाला किंवा करण्यात आला हा निष्कर्ष कशाच्या आधारे काढला हा प्रश्न आहे. कॉंग्रेस भाजपवर करत असलेले आरोप हास्यास्पद आहेत. प्रसिद्धी मिळवण्याचा हा प्रयत्न असू शकतो, असं चव्हाण म्हणाले.