‘कॉंग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढा’; पटोलेंची ऑफर ठाकरेंच्या नेत्यांने धुडकावली
Vinod Ghosalakar on Nana Patole : लोकसभेसाठी (Lok Sabha Elections) महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) जागावाटपं निश्चित झालं आहे. जागावाटपात उत्तर मुंबईची जागा कॉग्रेसकडे (Congress) गेली. मात्र, कॉंग्रेसकडे या जागेसाठी उमेदवार नाही. दरम्यान, आता ठाकरे गटाचे नेते विनोद घोसाळकर (Vinod Ghosalakar) यांनी मोठा दावा केला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेसच्या चिन्हावर लोकसभा निवडणूक लढवण्याची ऑफर दिल्याचा दावा घोसाळकर यांनी केला आहे.
सुधीर मुनगंटीवारांना ‘ते’ विधान भोवलं; निवडणूक आयोगाने घेतली दखल…
लोकसभेसाठी महाविकास आघाडीचा जागावाटपं निश्चित झालं. शिवसेना ठाकरे पक्ष 21, काँग्रेस 17 जागांवर आणि शरद पवार गट 10 जागांवर निवडणूक लढवणार आहे. मात्र, जागावाटपाचा निर्णय झाला असला तरी मविआत अजूनही काही जागांवरून तणाव आहे. उत्तर मुंबईची जागा कॉंग्रेसकडे गेल्याने ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेत ही जागा ठाकरे गटाकडे यावी आणि तिथं घोसाळकरांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी केली.
सांगलीसाठी शेवटपर्यंत प्रयत्न करणार : मॅच सोडायला विश्वजीत कदम अन् विशाल पाटलांचा नकार
ठाकरेंची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना घोसाळकर म्हणाले की, उत्तर मुंबई काँग्रेसच्या वाट्याला आली आहे. मात्र, सुरूवातीला उमेदवार उमेदवार त्यांच्याकडे नसल्यानं उद्धव ठाकरेंनी मला तयारी करण्यास सांगितले होते. मात्र, आता ही जागा कॉंग्रेसकडे गेली. नाना पटोलेंनी कालच मला काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवणार? अशी ऑफर दिली, पण मी त्यांना नाही म्हटलं. कारण एवढी वर्ष साहेबांसोबत आहोत. केवळ लोकसभेला जाणं योग्य वाटत नाही, असं घोसाळकर म्हणाले.
ते म्हणाले, उत्तर मुंबईची जागा शिवसेनेने लढावी, असे स्थानिक कार्यकर्त्यांचे (ठाकरे गटाचे) म्हणणे आहे. आता महाविकास आघाडीचे नेते या संदर्भात निर्णय घेतील.
तर ठाकरे गटाच्या प्रवक्त्या संजना घाडी म्हणाल्या, उत्तर मुंबईची जागा काँग्रेसची असून शिवसेना पूर्ण ताकद देणार, असं ठरलं होतं. मात्र उमेदवार नसल्याचे कळल्यानंतर गेल्या दोन-तीन आठवड्यांपासून शिवसेनेत विनोद घोसाळकर यांच्या नावाची चर्चा झाली. घोसाळकर हे स्थानिक नेते आहेत. यांच्यापेक्षा चांगला उमेदवार तिथं नाही, असं वर्षा गायकवाड देखील सांगत आल्या आहेत.
दरम्यान, उत्तर मुंबईच्या जागेवर आता महाविकास आघाडीतील घटक पक्ष काय निर्णय घेतात हेच पाहणं महत्वाचं आहे.