Lok Sabha Election: माढा, सातारा, सोलापूरमध्ये पंतप्रधानांच्या सभांचा धडाका ! पुण्यात मुक्काम

  • Written By: Published:
Lok Sabha Election: माढा, सातारा, सोलापूरमध्ये पंतप्रधानांच्या सभांचा धडाका ! पुण्यात मुक्काम

PM Narendra Modi Public Meeting programme Western Mahrashtra : लोकसभा निवडणुकीत भाजपसाठी (BJP) महाराष्ट्र महत्त्वाचे राज्य आहे. येथून सर्वाधिक जागा जिंकण्यासाठी महायुतीने मिशन 45 हा नारा दिला आहे. हा नारा प्रत्यक्षात आणण्यासाठी महायुतीचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अमित शाह यांच्यासह इतर स्टार प्रचारांचा सभांचा धडका सुरू आहे. नागपूर, नांदेड, परभणी, चंद्रपूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभा झाल्या आहेत. पुढच्या टप्प्यात पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाच्या तीन लोकसभा मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या सभा होणार आहेत. सलग दोन दिवस ते महाराष्ट्राच्या दौऱ्यावर राहणार असून, पुण्यात (Pune) मुक्कामही करणार आहेत.

Rohit Pawar On Ajit Pawar : हाच का तुमचा स्वाभिमान?, अजित पवारांवर रोहित पवारांचा घणाघात

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २९ एप्रिलला रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यानंतर लातूरचा महायुतीच्या उमेदवाराची दुपारी तीन वाजता सभा होणार आहेत. याच दिवशी रात्री पुण्यात पंतप्रधान हे मुक्कामी राहणार आहेत. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तीन सभा सभा घेणार आहेत. सोलापूरला सकाळी अकरा वाजता पंतप्रधानांची सभा होणार आहे. ही जागा मागील वेळेस भाजपने जिंकली होती. यावेळेस येथे भाजपचे राम सातपुते आणि काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांच्यात लढत होत आहे. ही जागा भाजपला महत्त्वाची आहे. दुसरी सभा सातारा लोकसभा मतदारसंघात होत आहे. कराड येथे ३० एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे. ही सभा दुपारी पावणेबारा वाजता होणार आहे. येथे भाजपचे उदयनराजे भोसले व शरद पवार गटाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यात लढत होत आहे. उदयनराजे भोसले यांना निवडून आणण्यासाठी भाजपकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींची येथील सभाही महत्त्वाची आहे.

Abhu Dhabi च्या आयफा उत्सवमसाठी रॉकस्टार डीएसपी सज्ज; प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणार संगीतमय मैफिल

माढ्यात दुपारी पंतप्रधान तोफ डागणार
माढा मतदारसंघात भाजपचे रणजितसिंह निंबाळकर खासदार आहेत. तेच पुन्हा उमेदवार आहेत. परंतु यंदा त्यांच्यासमोर मोहिते कुटुंबातील धैर्यशील मोहिते यांचे कडवे आव्हान आहे. मोहिते कुटुंब भाजपमध्ये होते. परंतु ते आता शरद पवार गटात आले आहेत. तसेच स्थानिक नेते उत्तमराव जानकरही ही मोहिते यांच्या साथीला आहे. त्यामुळे ही जागा भाजपसाठी प्रतिष्ठेची झाली आहे.

टार्गेटवर कोण ?

सोलापूर मतदारसंघात माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे यांची मुलगी प्रणिती शिंदे या रिंगणात आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे घराणीशाहीवरून काँग्रेसवर टीका करतील. तर माढा व सातारा येथे भाजपसमोर शरद पवार गटाचे आव्हान आहे. हा भाग शरद पवारांचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शरद पवारांवर निशाणा साधू शकतात.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube