भाजपनं 35 वर्षांपूर्वी सोडला होता कोकणचा नाद… आता ‘राणेंना’ कमळ फुलवायला जमणार का?

भाजपनं 35 वर्षांपूर्वी सोडला होता कोकणचा नाद… आता ‘राणेंना’ कमळ फुलवायला जमणार का?

कोकण म्हणजे कधीकाळचा समाजवाद्यांचा आणि काँग्रेसी विचारांचा बालेकिल्ला होता. बॅ. नाथ पै, प्राध्यापक मधू दंडवते (Madhu Dandavate) असे कट्टर समाजवादी चेहरे, सुधीर सावंत, शारदा मुखर्जी, हुसेन दलवाई, गोविंदराव निकम असे काँग्रेसी (Congress) चेहरे विचारांचे चेहरे कोकणातून निवडून आले होते. हळू हळू कोकणात (Kokan) शिवसेनेनं हातपाय पसरले. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या मुंबईची ओळख कधीकाळी गिरण्यांचं शहर अशी होती. मुंबईच्या गिरण्यांमध्ये लाखो कामगार करायचे. शिवसेना (Shivsena) मुंबईतील याच गिरणी कामगारांमध्ये रुजली. चाकरमान्यांच्या माध्यमातून शिवसेना कोकणापर्यंत पोहोचली. कोकणी माणूस सेनेचा हक्काचा मतदार झाला. (BJP has nominated Narayan Rane from Ratnagiri-Sindhudurg constituency.)

तेव्हापासून आजपर्यंत जुन्या रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातून चारवेळा, जुन्या राजापूरमधून चारवेळा आणि अलिकडे तयार झालेल्या रत्नागिरी-सिंधुदुर्गतून दोनवेळा तर रायगडमधून दोनवेळा शिवसेनेचा उमेदवार विजयी झाला. पण शिवसेनेच्याही आधी समाजवाद्यांच्या आणि काँग्रेसच्या या बालेकिल्ल्याला हादरे देण्याचं काम भाजपनं केलं होतं. त्यावेळी भाजपला त्यात यश आलं नव्हतं. पण आता तब्बल 30-35 वर्षांनंतर भाजपनं कोकणात पुन्हा एन्ट्री घेतली आहे. आता भाजपला इथे समाजवादी आणि काँग्रेसच्या नाही तर शिवसेनेच्या मतांना आपल्याकडे वळवायचे आहे. नारायण राणेंच्या माध्यमातून भाजपनं कोकणात पुन्हा कमळ फुलवायला घेतलं आहे…

नेमकं काय घडलं होतं 35 वर्षांपूर्वी आणि आता राणेंना कमळ फुलवायला जमणार का? नेमकं काय घडतयं कोकणात पाहुया…

जुना रत्नागिरी आणि आताचा रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ. या मतदारसंघाची पुनर्रचना होण्यापूर्वी रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातून 1984 आणि 1989 मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपनं ज्येष्ठ नेते श्रीधर नातू यांना मैदानात उतरवलं होतं. त्या दोन्हीमध्ये त्यांचा पराभव झाला. त्यावेळी सेना लोकसभेच्या रिंगणात नव्हती. पुढे 1991 पासून शिवसेना-भाजपची युती झाली. सलग दोनवेळा पराभव झाल्यानंतर भाजपकडील कोकणातील राजापूर, रत्नागिरी हे दोन्ही मतदारसंघ शिवसेनेकडे गेले. रत्नागिरीतून अनंत गिते आणि राजापूरमधून वामनराव महाडिकांना तिकीट मिळाले. दोन्हीमध्ये सेनेचा पराभव झाला. पण मते चांगली मिळाली होती.

Lok Sabha Election : संभाजीनगरची लढत फिक्स ! खैरेंविरोधात मंत्री संदीपान भुमरेंना उमेदवारी

1996 मध्ये पुन्हा रत्नागिरीतून अनंत गितेंना आणि राजापूरमधून सुरेश प्रभूंना उमेदवारी मिळाली. दोन्ही ठिकाणी शिवसेनेचा दणदणीत विजय झाला. तेव्हापासून हे दोन्ही मतदारसंघ एखादा अपवाद वगळता शिवसेनेकडेच राहिले आहेत. आता महाविकास आघाडीमध्ये रायगड आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग हे दोन्ही लोकसभा मतदारसंघ शिवसेनेकडेच आहेत. तर महायुतीमध्ये राष्ट्रवादी आणि भाजपकडे गेले आहेत. रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून भाजपने नारायण राणे यांना उमेदवारी दिली आहे. शिवसेनेच्या वाट्याच्या या मतदारसंघातून भाजप पहिल्यांदाच आपले नशीब आजमावणार आहे.

नारायण राणे भाजपमध्ये येण्यापूर्वी कोकणात भाजपची ताकद नव्हती असे नाही. पण ती नातू कुटुंबापुरतीच मर्यादित होती. राणे भाजपमध्ये येण्यापूर्वीची दोन निवडणुकांची परिस्थिती लक्षात घेतली तर 2009 मध्ये रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 15 विधानसभा मतदारसंघापैकी केवळ कणकवलीतून प्रमोद जठार हेच निवडून आले होते. तर 2014 मध्ये पनवेलमधून प्रशांत ठाकूर हेच भाजपचे आमदार निवडून येऊ शकले होते. राणे भाजपमध्ये आल्यानंतर कोकणातील नगरपालिका, जिल्हा बँकेत भाजपला शिरकाव करता आला. सध्या पंधरापैकी कणकवली, पनवेल, उरण आणि पेन या चार मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. शिवाय आता राणेंमुळेच भाजपला रत्नागिरी-सिंधुदुर्गची जागा स्वतःकडे घेण्यात यश मिळाले आहे.

नारायण राणेंना वातावरण किती अनुकूल?

मतदार संघात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन आणि रत्नागिरी जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघ येतात. रत्नागिरीमध्ये शिवसेनेचे उदय सामंत आणि चिपळूणमध्ये राष्ट्रवादीचे शेखर निकम हे आमदार आहेत. त्यामुळे तिथे राणेंचं पारडं जड राहील तर राजापुरात ठाकरेंच्या सेनेचे राजन साळवी आमदार असल्यामुळे महाविकास आघाडीला लाभ होईल, असे राजकीय चित्र आहे. तळकोकणातील कणकवलीत भाजपचे नीतेश राणे आणि सावंतवाडीमध्ये दीपक केसरकर हे शिवसेनेचे आमदार आहेत. तर कुडाळमध्ये ठाकरेंच्या सेनेचे वैभव नाईक आमदार आहेत. त्यामुळे कुडाळमध्ये भाजपला जास्त ताकद लावावी लागणा आहे.

पवारांचा विरोध असताना रोहित पवार आमदार कसे झाले? अजित पवारांनी सांगितली पडद्यामागची स्टोरी

या मतदारसंघात राणे सत्ताधारी असले केंद्रीय मंत्री असले तरीही त्यांचा दोनवेळा पराभव झाला आहे, हेही विसरुन चालणार नाही. रिफायनरीमुळे भाजपविरोधात तयार झालेले वातावरण हा फॅक्टरही त्यांच्या विरोधात जाणारा ठरु शकतो. शिवाय ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत यांच्या बाजूने असलेली सहानुभूती, शिवसेनेची ताकद, वैभव नाईक हेही घटक निर्णायक ठरणार हे नक्की.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज