पुरस्कारासाठी आटापिटा, मला नोबेल द्या, नाहीतर…; नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना ट्रम्प यांची धमकी

पुरस्कारासाठी आटापिटा, मला नोबेल द्या, नाहीतर…; नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना ट्रम्प यांची धमकी

Donald Trump threatens Norway finance minister : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना फोनवरून धमकी दिल्याची बातमी समोर आली आहे. नॉर्वेच्या ‘डेगेन्स नेरिंगस्लिव्ह’ या वृत्तपत्राने १७ ऑगस्ट २०२५ रोजी याबाबत खुलासा केला. ट्रम्प यांनी नॉर्वेचे अर्थमंत्री जेन्स स्टोल्टनबर्ग (Jens Stoltenberg) यांना व्यापार आणि टॅरिफच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी फोन केला होता. पण ट्रम्प यांनी अचानक नोबेल शांतता पुरस्काराचा (Nobel Peace Prize) विषय काढला. आपल्याला नोबेल पुरस्कार न दिल्यास नॉर्वेवर जास्त टॅरिफ लादण्याची धमकीच ट्रम्प यांनी दिली.

‘ 7 दिवसांच्या आत प्रतिज्ञापत्र द्या… अन्यथा देशाची माफी मागा’ निवडणूक आयोगाचा राहुल गांधींवर निशाणा 

ट्रम्प यांनी नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना फोनवरून धमकी दिल्याची बातमी ‘डेगेन्स नेरिंगस्लिव्ह’ या वृत्तपत्राने ही दिली आहे. ट्रम्प यांनी नॉर्वेचे अर्थमंत्री जेन्स स्टोल्टनबर्ग यांच्याशी व्यापार आणि टॅरिफबाबत बोलण्यासाठी फोन केला होता. पण, चर्चा अचानक नोबेल शांतता पुरस्काराकडे वळली आणि ट्रम्प यांनी धमकीवजा इशारा दिलाय. वृत्तपत्राने दावा केलाय की, जेन्स स्टोल्टनबर्ग ओस्लोच्या रस्त्यावर चालत असताना ट्रम्प यांचा फोन आला. ट्रम्प यांनी टॅरिफच्या मुद्द्यावर चर्चा सुरू केली, पण नंतर त्यांनी नोबेल पुरस्काराचा विषय काढला. जर मला नोबेल पुरस्कार मिळाला नाही, तर नॉर्वेवर मोठे टॅरिफ लादू, अशी धमकी ट्रम्प यांनी दिली आहे.

यापूर्वी अमेरिकेच्या चार माजी राष्ट्राध्यक्षांना हा सन्मान मिळाला आहे. त्यामुळे आपल्याला देखील नोबेल शांतता पुरस्कार मिळावा, अशी ट्रम्प यांची इच्छा आहे. ट्रम्प यांनी यापूर्वीही इस्रायल-हमास, भारत-पाकिस्तान आणि कंबोडियातील युद्ध थांबवल्याचा दावा केला आहे, त्यामुळे आपल्या नोबेल पुरस्कार मिळावा, यासाठी ते प्रयत्नशील आहेत. मात्र, भारताने त्यांचा हा दावा नाकारला आहे. तरीही, इस्रायल, पाकिस्तान आणि कंबोडियासह काही देशांनी ट्रम्प यांना नोबेलसाठी नामांकन दिले आहे.

सरन्यायाधिश गवईंनी इतकं मनावर घेतलं की थेट तारीखच ठरवली, मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला किस्सा 

दरम्यान, अमेरिकेने नॉर्वेवर १५% आयात कर लादला आहे, आणि ट्रम्प यांनी यापेक्षा जास्त कर लादण्याची धमकी दिली. ही धमकी ऐकून नॉर्वेमध्ये खळबळ माजली आहे.

नॉर्वेच्या संसदेने नियुक्त केलेली नोबेल समिती हा पुरस्कार देते, पण ट्रम्प यांनी थेट धमकी देऊन पुरस्कार मिळवण्याचा प्रयत्न केल्याने जगभरातून टीका होत आहे.
अनेकांचे म्हणणे आहे की, शांततेचा नोबेल पुरस्कार हा सन्मानाचा विषय आहे, पण ट्रम्प यांनी धमकी देऊन तो मिळवण्याचा प्रयत्न करणे चुकीचं आहे. अनेक राष्ट्रांनी नोबेल पुरस्काराच्या मुद्द्यावरून ट्रम्प यांच्यावर नैतिकतेचा प्रश्न उपस्थित केलाय.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube