काही लोकं बेन्टेक्सचं त्यांचं काय करायचं? हे भाजपच्या खऱ्या सोन्याने पहावं; रोहित पवारांचा पडळकरांवर निशाणा

Rohit Pawar on Gopichand Padalkar : महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या प्रा.डॉ. एनडी पाटील विधी महाविद्यालय, श्रीमती सरोज नारायण पाटील मानसशास्त्र संशोधन केंद्र आणि प्रा. डॉ. एनडी पाटील बहुउद्देशीय सभागृहाच्या उद्घाटन कार्यक्रम पार पाडला यावेळी व्यासपीठावर उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार रोहित पवार उपस्थित होते. यावेळी रोहित पवार यांनी चंद्रकांत पाटलांच कौतुक करत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर घणाघाती टीका केली.
काय म्हणाले रोहित पवार?
सांगली जिल्ह्यात संस्कृतीला फार महत्व दिलं जात. आज चंद्रकात पाटील येथे उपस्थित आहेत. आजच्या काळात काही लोक आहेत. पण तुम्ही भाजपचे नेते असले तरी देखील तुम्ही खऱ्या अर्थाने भाजपचं सोनं आहात. त्या पक्षात तुम्ही अनेक वर्ष राहिलेले आहात. जेव्हा आम्ही तुम्हाला भेटतो. तुम्ही आमचं एकूण घेता. मुलं किंवा विद्यार्थ्यांचा प्रश्न तुम्ही लगेचच सोडवता. लगेच फोन लावता ही तुमचा स्टाईल आम्हाला आवडते. तुमतं राजकारणाच्या ठिकाणी राजकारण आहे. सामाजकारणाच्या ठिकाणी समाजकारण आहे. तुम्ही सोनं आहात पण आताच्या काळामध्ये काही बेन्टेक्स लोकं या जिल्ह्यामध्ये फिरत आहेत. खालंच्या लेव्हलला जाऊन मोठ्या नेत्यांबद्दल बोलत आहेत. त्यामुळे या बेन्टेक्सच्या सोन्याचं काय करायचं ? हे भाजपच्या खऱ्या सोन्याने लक्षात घ्यावं. असं म्हणत रोहित पवार यांनी अप्रत्यक्ष रित्या भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर घणाघाती टीका केली.
..त्या काळात मी मंदिरात जाण्याचा आग्रह धरला; मासिक पाळीबद्दल अभिनेत्री अन् खासदार कंगना काय म्हणाली?
तर अजित पवारांवर बोलताना रोहित पवार म्हणाले की, या व्यासपीठावर अनेक दिग्गज नेते आहेत. क्रिकेटच्या भाषेत सांगायचं झालं तर राजकारणातील मोठे-मोठे खेळाडू या व्यासपीठावर बासलेले आहेत. अजितदादांच्या बाबतीत सांगायचं झालं तर ते यॉर्कर टाकणारे आहेत. त्यांच्या स्पीडची काही प्रमाणात बॅट्समनला भीती वाटते. तर चंद्रकांतदादा कधी बॉलिंग कधी बॅंटिंग करतात. ते मिडीयम पेस बॉलर आहेत. पण बॉलिंग चांगली करतात. तर जयंत पाटील हे कधी ऑफ स्पिन, कधी लेग स्पिन तर कधी गुगली टाकतात. तर कधी बॉल हातातच ठेवून बॉलिंग केल्यासारखं भासवतात. त्यात आम्ही नवखे खेळाडू या दिग्गज खेळाडूंच्या बॉलला मारण्याचा प्रयत्न करतो. असं म्हणत रोहित पवारांनी राजकीय फटकेबाजी केली.