Lok Sabha Election : संभाजीनगरची लढत फिक्स ! खैरेंविरोधात मंत्री संदीपान भुमरेंना उमेदवारी

  • Written By: Published:
Lok Sabha Election : संभाजीनगरची लढत फिक्स ! खैरेंविरोधात मंत्री संदीपान भुमरेंना उमेदवारी

Sandipan Bhumre Shinde group Candidate For Sambhajinagar Lok Sabha: छत्रपती संभाजीनगर (Sambhajinagar Lok Sabha) लोकसभा मतदारसंघाची लढत आता ठरली आहे. या मतदारसंघातून उद्धव ठाकरे गटाने माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्याविरोधात एकनाथ शिंदे गटाने संदीपान भुमरे ( Sandipan Bhumre) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. संदीपान भुमरे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री आहेत. ते पैठण विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यामुळे आता दोन्ही सेनेच्या जुन्या खांद्या शिवसैनिकांमध्ये येथे चुरशीची लढाई होणार आहे.


तिकीट मिळणार नसल्याने, माझं अन् मोहिते पाटलांचं सहा महिन्यांपूर्वीच ठरलं होतं की…; जानकरांचा गौप्यस्फोट


https://x.com/Shivsenaofc/status/1781650133916295259

शिंदेंनी जागा पदरात पाडून घेतली

ही जागा भाजपला हवी होती. त्यासाठी संभाजीनगरमधील स्थानिक भाजप नेते हे प्रयत्न करत होते. राज्यमंत्री भागवत कराड यांना उमेदवारी हवी होती. त्यासाठी ते प्रयत्न करत होते. त्यामुळे महायुतीमध्ये या जागेवर तिढा निर्माण झाला होता. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ही जागा आपल्याकडे ठेवण्याकडे यशस्वी ठरले आहेत.

टेस्लाचे प्रमुख इलॉन मस्क यांनी भारत दौरा केला अचानक रद्द, वाचा काय आहे कारण?


यंदा चौरंगी लढत, फटका कुणाला ?

संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे. येथून तीन टर्म खासदार राहिलेले चंद्रकांत खैरे हे मागील निवडणुकीत पराभूत झाले होते. मतविभाजनाचा त्यांना मोठा फटका बसला होता. चौरंगी लढतीत एमआयएमचे इम्तियाज जलील यांना खासदारकीची लॉटरी लागली होती. अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांनी चांगली मते घेतली होती. यंदा या मतदारसंघात अशीच लढत होईल, असे स्पष्ट दिसत आहे. खैरे, भुमरे हे दोन्ही सेनेचे उमेदवार आहेत. तर इम्तियाज जलील हे एमआयएमचे उमेदवार आहेत. तर हर्षवर्धन जाधव हे पुन्हा लोकसभेच्या रिंगणात उतरणार आहेत. त्यामुळे यंदाही येथे चौरंगीच लढत होणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube