संदीपान भुमरे फक्त 8 दिवसच पालकमंत्री राहणार, चंद्रकांत खैरेंचा दावा

Untitled Design   2023 04 14T151457.228

Chandrakant Khaire Said Bhumare will be Guardian Minister for eight days only: गेल्या काही महिन्यांपासून पाच सदस्यीय घटनापीठापुढे सुरु असलेली सत्तासंघर्षाची सुनावणी काही दिवसांपूर्वी पूर्ण झाली. खंडपीठाने ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या वकिलांची बाजू ऐकून घेतली. सगळा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर सर्वोच्च न्यायालायने (Supreme Court) आपला निर्णय राखून ठेवा आहे. सुप्रीम कोर्टाचा निकाल कधीही लागू शकतो. मात्र, कोर्टाचं निकाल काय लागतो, याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. सुप्रीम कोर्टाचा निर्णय कधीही येईल आणि शिंदे-फडणवीस सरकार कोसळेल, असे दावे केले जात आहेत. अशातच ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी मोठं विधान केलं. संभाजीनगरचे पालकमंत्री संदीपान भुमरे (Sandipan Bhumre) फक्त आठ दिवसच पालकमंत्री (Guardian Minister) राहतील, असा गौप्यस्पोट खैरेंनी केला आहे.

चंद्रकांत खैरे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना खैरेंनी मोठा गौप्यस्फोट केला. पत्रकारांनी पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्याविषयी प्रश्न विचारला असता, खैरेंनी भूमरेंवर तोंडसुख घेतलं. ते म्हणाले की, कोण पालकमंत्री? संदीपान भुमरे हे आता फक्त 8 दिवसच पालकमंत्री राहणार आहेत. तुम्ही लिहून घ्या. मी उन्हात उभा आहे, सूर्यनारायणाच्या साक्षाने आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या साक्षीने सांगतो, संदीपान भुमरे पालकमंत्रीपदावर फक्त 8 दिवस राहतील. मी कधीही खोटं बोलत नाही, असं ते म्हणाले.

“तुम्हाला विद्रोह दाबता येणार नाही” रॅपर शुभम जाधवच्या अटकेवर जितेंद्र आव्हाड संतापले

पत्रकांरांनी याचं कारण विचारले असता, खैरे म्हणाले की, याचं कारण सगळ्यांना ठाऊक आहे. आणि तुम्हीही शोध घ्या. त्याने सव्वा 2 कोटी रूपयांची गाडी घेतली. 12 दारूची दुकानं घेतली. एकीकडं बाळासाहेब आंबेडकरांना आपल्याला व्यसन न करण्याचा सल्ला दिला. ज्या पैठणचे भूमहे हे सध्या आमदार आहेत. त्या संतांच्या भूमीत एकनाथ महाराजांनी व्यवसनांचे दुष्परिणाम सांगितले. तिथल्याच आमदार असलेल्या भुमरेंनी आता तिथं 12 दारूची दुकानं विकत घेतली. त्यामुळं त्याच्यामागे ईडीचा ससेमिरा लागणार असल्याची शक्यता खैरेंनी वर्तवली.

नऊ महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी 40 आमदारांना घेऊन शिवसेनेत बंड केलं होतं. त्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळलं. आणि राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आलं. तेव्हापासून शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात आरोप-प्रत्योरोपाच्या फैरी झडत आहेत. अशातच काल ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मोठा दावा केला होता. भाजप सोबत जाण्यापूर्वी मातोश्रीवर येऊन एकनाथ शिंदे रडले होते. माझ्यामागे केंद्रीय तपास यंत्रणा लागू शकतात. भाजपला मला अटक करू शकते, याच्या धास्तीने शिंदे रडले, असा दावा आदित्य ठाकरेंनी केला आहे. याविषयी पत्रकारांनी खैरेंना विचारले. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर बोलतांना खैरे म्हणाले की, आदित्य ठाकरे हे जे काही बोलले, ते खर तेच बोलले आहेत. मातोश्रीवर कुणीही खोटं बोलत नाही. मला सुध्दा हा किस्सा ठाऊक होता. मात्र, मी आजवर याविषयी बोललो नाही, असं खैरे म्हणाले.

 

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube