टेस्लाचे प्रमुख इलॉन मस्क यांनी भारत दौरा केला अचानक रद्द, वाचा काय आहे कारण?

टेस्लाचे प्रमुख इलॉन मस्क यांनी भारत दौरा केला अचानक रद्द, वाचा काय आहे कारण?

Elon Musk India Visit Postpones : भारत भेटीवर येणारे टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांनी भारत दौर करण्यात आल्याची माहिती एक्स (ट्वीटर)वरून दिली आहे. यामध्ये मस्क यांनी ठोस कुठलही कारण दिलं नाही. मात्र, टेस्लाची काही महत्चाची काम असल्याने सध्या येता येत नाही असा उल्लेख मस्क यांनी केला आहे. इलॉन मस्क (Elon Musk) हे 21 आणि 22 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi Met Elon Musk ) यांची भेट घेण्यासाठी भारत दौऱ्यावर येणार होते. त्यांच्या या भेटीतून आशियाई बाजारपेठेत व्यावसायीक काही वाटाघाटी करता का? अशी योजना तयार होण्याची संभवना होती. (Tesla) दरम्यान, सध्या भारत भेटीवर येता येत नसले तरी आपण वर्षाअखेर भारत भेटीवर येऊ शकतो असंही मस्क आपल्या एक्सवरील निवेदनात म्हटलं आहेत.

 

स्थायी सदस्यत्वाचं केल होतं समर्थन

इलॉन मस्क यांचा दौरा नियोजीत असताना अचानक तो रद्द झाल्याने तर्कवितर्क लावले जात आहेत. कारण मस्क यांच्या भेटीनंतर भारतातील बाजारपेठेच्या भागीदारीबद्दल काहीतरी मोठी घोषणा मस्क करतील अशी चर्चा सुरू होती. मात्र, अचानक मस्क यांचा दौरा रद्द झाला. काही दिवसांपूर्वी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेतील भारताच्या स्थायी सदस्यत्वाचं इलॉन मस्क यांनी समर्थन केलं होतं. आणि त्यानंतर हा दौरा होत असल्याने भारतातील बाजारपेठेत काही बदल होऊ शकतात अशी शक्यताही वर्तवली जात होती.

 

मोदींची झाली दोनवेळा भेट

मिळालेल्या माहितीनुसार भारताच्या सध्याच्या बाजारपेठेत इलॉन मस्क हे सुमारे 20 ते 30 अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहेत. त्यांनी या परिस्थितीबद्दल अनेक दिवसांपासून आढावा घेतला असून, ते लवकरच अशी अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे. परंतु, आत्ता होणारा दौरा लांबल्यामुळे तशी काही घोषणा इतक्यात होईल अशी शक्यता नाही. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट झाल्यानंतर मस्क हे याबाबतची घोषणा करण्याची शक्यता आहे. दरम्यान, पंतप्रधान मोदींनी काही मुलाखतीमध्ये सांगितलेलं आहे की, इलॉन मस्क दोनवेळा आपल्याला भेटले असून त्यांनी भारतात गुंतवणूक करण्याबाबत चर्चा केली आहे. त्यामुळे मस्क लवकरच भारत दौऱ्यावर येऊन अशी काही घोषणा करतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.

 

मस्क यांचा भारत दौरा महत्वाचा

इलॉन मस्क यांची टेस्ला कंपनी इलेक्ट्रिक आणि ड्रायव्हरलेस कार निर्मीतीसाठी प्रसिद्ध आहे. भारताने इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्याची नीती राबवली आहे. त्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने नवी इलेक्ट्रीक वाहनं निर्मिती नितीची घोषणा केली आहे. त्याचबरोबर मेक इन इंडिया अंतर्गत इलेक्ट्रीक कार कंपन्यांना टॅक्समधून दिलासा देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्या माध्यमातून आत्ता होणार इलॉन मस्क यांचा भारत दौरा महत्वाचा मानला जात होता

follow us
  • fb
  • instagram
  • youtube