देशातील टेस्लाची पहिली कार मीच खरेदी करणार, मंत्री प्रताप सरनाईकांचा निर्धार

Pratap Sarnaik On Tesla Car: देशात टेस्ला कार (Tesla Car) 15 जुलै रोजी दिमाखात दाखल झाली. काल टेस्लाच्या उद्घाटन समारंभाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) उपस्थित होते. मात्र, एकनाथ शिंदे समारंभाला उपस्थित नव्हते. त्यामुळे मंत्री सरनाईक ही कार विधानभवनात घेऊन आले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विधानभवन परिसरात या कारची टेस्ट ड्राइव्ह घेतली. यावेळी माध्यमांशी बोलताना प्रताप सरनाईक यांनी देशातील पहिली टेस्ला कार खरेदी करण्याची तयारी दर्शवली.
..पण भरलेल्या ताटाशी कधी प्रतारणाही केली नाही, दानवेंच्या समारोप प्रसंगी उद्धव ठाकेंचा शिंदेना टोला
मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानभवन परिसरात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, टेस्ला कार देशात येणं आणि मुंबईतून तिचे वितरणं ही चांगली बाब आहे. याचा फायदा नव्याने गाडी घेणाऱ्यांना होणार आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना दावोसला गेले होते, तेव्हा त्यांनी टेस्लाने महाराष्ट्रात यावं, असं म्हटलं होतं. त्यांच्या आव्हानाला टेस्लाच्या अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आणि त्यांनी टेस्ला कार मुंबईत लॉन्च केला. त्यांना जे जे सहकार्य लागेल, ते सहकार्य सरकार करेल. टेस्ला सारख्या मोठ्या कंपन्या महाराष्ट्रात आल्या तर राज्य नक्कीच पुढं जाईल, असं सरनाईक म्हणाले.
उद्धवजी सत्तेत या, आपण विचार करु अन् बोलू; मुख्यमंत्री फडणवीसांची जाहीर ऑफर
यावेळी सरनाईक यांनी देशातील पहिली टेस्ला कार खरेदी करण्याची तयारी आणि इच्छा व्यक्त केली. सरनाईक म्हणाले, राज्याचा परिवहन मंत्री म्हणून मी पहिली कार घेणार आहे. कारची जी काही किंमत असेल ती देऊ. परिवहन मंत्र्याने कार घेतली तर चांगला मेसेज जाईल, असंही सरनाईक म्हणाले.
टेस्ला कारचे बुकिंग कधीपासून करता येईल, असा सवाल केला असता सरनाईक म्हणाले, आता फक्त शोरूम सुरू झाले आहे. लवकरच बाकीच्या प्रक्रिया पूर्ण करून टेस्लाची गाडी वितरित करण्याची प्रक्रिया कंपनीकडून सुरू केली जाईल, असं सरनाईक म्हणाले.
दरम्यान, टेस्लाचे जागतिक स्तरावर लोकप्रिय असलेले मॉडेल ‘Model Y’ भारतात लाँच करण्यात आले असून ही कार फक्त १५ मिनिटांत चार्ज करता येते. एकदा चार्ज केल्यावर कार ६०० किमी पर्यंत धावू शकते. ही शून्य प्रदूषण करणारी इलेक्ट्रिक कार आहे.