ठरलं, भारतीय बाजारात येणार टेस्लाची पहिली इलेक्ट्रिक कार, ‘या’ दिवशी होणार लाँच, किंमत 21 लाखांपेक्षा कमी

Tesla Electric Car : भारतीय बाजारात गेल्या काही दिवसांपासून जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती एलोन मस्क (Elon Musk) यांच्या मालकीची टेस्ला कंपनी भारतीय बाजारात इलेक्ट्रिक कार लाँच करणार असल्याची चर्चा सुरु आहे. तर आता एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार टेस्ला लवकरच भारतीय बाजारात पहिली इलेक्ट्रिक (Tesla Electric Car) लाँच करणार आहे. CNBC-TV18 च्या एका अहवालानुसार, भारतीय बाजारात टेस्ला एप्रिल 2025 मध्ये इलेक्ट्रिक कार लाँच करणार आहे. ही कार बर्लिनमधील टेस्ला प्लांटमधून आयात करण्यात येणार आहे.
माहितीनुसार, टेस्ला भारतीय बाजारात 25,000 डॉलर्स (सुमारे 21 लाख रुपये) पेक्षा कमी किमतीची इलेक्ट्रिक कार आणणार आहे. कमी किंमतीमध्ये जास्त फिचर्स देऊन कंपनी बाजारात आपला हिस्सा वाढवण्याता प्रयत्न करणार आहे. भारतीय बाजारात टेस्लाची इलेक्ट्रिक कार BYD कंपनीला टक्कर देणार आहे. माहितीनुसार, टेस्ला कंपनीच्या मालकीच्या शोरूमसाठी दिल्लीतील एरोसिटी आणि मुंबईतील बीकेसी ओपन होणार आहे. याच बरोबर टेस्लाने मुंबईत नोकऱ्यांसाठी आधीच जाहिरात दिली आहे. यामध्ये स्टोअर मॅनेजर, सर्व्हिस अॅडव्हायझर, सर्व्हिस टेक्निशियन आणि इतर जॉब प्रोफाइल समाविष्ट आहेत.
अमेरिकेकडून परस्पर शुल्क आकारण्याच्या धोक्यामुळे केंद्र सरकार इलेक्ट्रिक कारवरील शुल्कात आणखी कपात करू शकतो, अशी देखील माहिती समोर आली आहे. अर्थसंकल्पात 40,000 डॉलर्सपेक्षा जास्त किमतीच्या आयात केलेल्या कारवरील बेसिक कस्टम ड्युटी (बीसीडी) 100% वरून 70% पर्यंत कमी करण्यात आली आहे, तर 40,000 डॉलर्सपर्यंतच्या किमतीच्या कारवरील प्रभावी बीसीडी 70% वर कायम ठेवण्यात आला आहे.
तर दुसरीकडे मस्कने अद्याप भारतात उत्पादन करण्यास वचनबद्ध नसले तरी, टेस्ला यावर्षी भारतातून 1 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त किमतीचे घटक मिळवू शकते आणि येत्या काही महिन्यांत ही संख्या लक्षणीयरीत्या वाढू शकते.
दोन मंत्र्यांच्या साथीनं सरकारचा डाव, नवं आंदोलन उभारणार; जरांगेंचा खळबळजनक दावा
या वर्षी क्वाड शिखर परिषदेसाठी भारत दौऱ्यावर येणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत मस्क येण्याची शक्यता आहे. त्या भेटीपूर्वी, अमेरिकेचे वाणिज्य सचिव हॉवर्ड लुटनिक आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्यात एक प्राथमिक बैठक होण्याची शक्यता आहे. दोन्ही नेते प्राथमिक बहु-क्षेत्रीय व्यापार करार आणि ऑटोमोबाईल टॅरिफवर स्वाक्षरी करण्यावर देखील चर्चा करतील.