आता ‘X’ ॲपद्वारे पैसे पाठवता येणार; इलॉन मस्कने लॉन्च केली ‘X Money’ सेवा…

उद्योगपती इलॉन मस्क यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X ला ‘सुपर ॲप’ बनवण्याच्या दिशेने आणखी एक मोठे पाऊल उचलले आहे.

Untitle (35)

X Money App : उद्योगपती इलॉन मस्क यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X ला ‘सुपर ॲप’ बनवण्याच्या दिशेने आणखी एक मोठे पाऊल उचलले आहे. कंपनीने ‘X Money’ नावाची डिजिटल पेमेंट सेवा सुरू केली आहे. या सुविधेद्वारे युजर्सना पैसे ट्रान्सफर करणे, बिल भरणे, डेबिट कार्ड वापरणे आणि इतर आर्थिक व्यवहार थेट X ॲपमधून करता येणार आहेत.

सध्या ही सेवा अमेरिकेतील X Premium आणि Premium+ सदस्यांसाठी टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून दिली जात आहे. भारतात मात्र X Money कधी सुरू होणार, याबाबत अद्याप अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.

काय आहे एक्स मनी?
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्समध्ये समाविष्ट असलेले एक्स मनी हे अॅप समाविष्ट असून या अॅपमधून सोशल नेटवर्किंग, डिजिटल पेमेंटसारखे लाभ घेता येणार आहेत. या माध्यमातून युजर्सला आपल्या खात्यात पैसे, वीजा डेबिट कार्डच्या सुविधा मिळणार आहेत. या व्यवहारांसाठी युजर्सला कोणत्याही प्रकारची अतिरिक्त रक्कम द्यावी लागणार नाही. बिल पेमेंट, वायर ट्रान्सफर, फिजिकल चेकसारख्या सुविधा या अॅपमध्ये उपलब्ध असणार आहेत. तसेच 3 टक्के कॅशबॅक आणि खात्यात जमा असलेल्या रक्कमेवर 6 टक्के वार्षिक व्याजदेखील मिळण्याचा दावा कंपनीने केला आहे.

X Money अॅप काम कसे करणार?
युजर्सच्या खात्यातील रक्कम रेगुलेटेड बॅंक क्रॉस रिवर बॅंकेत ठेवली जाणार असून ही बॅंक फेडरल डिपॉजिट म्हणजेच एफडीआईसीमध्ये असणार आहे. खात्यात ठेवलेल्या रक्कमेवर युजर्सला 2.50.000 डॉलरपर्यंतचा विम्याचा लाभ देखील मिळणार आहे.

धाराशिव-बीड-छत्रपती संभाजीनगर नवीन रेल्वेमार्गाला गती; सर्वेक्षणास रेल्वे मंत्रालयाची मंजुरी

एक्स कॅश स्विप प्रोग्रॅमच्या माध्यमातून युजर्सच्या रक्कमेला अनेक बॅंकेत पाठवता येणार आहे. तत्काळ पैसे ट्रान्सफर करण्यासाठी वीजा थेट आपल्या पद्धतीचा वापर करणार आहे. या पद्धतीत बॅंक अकाऊंट आणि डेबिट कार्डाच्या व्यवहारामध्ये तेजी होणार आहे. सुरक्षेसाठी या व्यवहारांमध्ये पासवर्डच्याऐवजी पास कीची मदत लागणार आहे. ज्यामध्ये फिंग्ररप्रिंट, फेस रिकग्निशन किंवा डिवाईस पिनच्या माध्यमातून लॉग इन केले जाणार आहे.

भारतात कधी येणार X Money?
सध्या तरी ही सुविधा अमेरिकेत लॉंच केलेली असून कंपनीने अद्यापपर्यंत भारतात लॉंचिंग करण्याबाबत माहिती दिलेली नाही. एलन मस्क यांनी जगभरातील इतर बाजारातही हे अॅप लॉंच करणार असल्याची माहिती दिलीयं. पुढील काळात X Money भारतात लॉंच झाल्यास गुगल पे, व्हॉट्सअप पेमेंट्स, फोन पे यांसह इतर डिजिटल बॅंकिग सेवांसोबत स्पर्धा होणार आहे.

follow us