सर्वात श्रीमंत व्यक्ती Elon Musk झाला 12 व्या मुलाचा बाप! सोशल मीडियावर दिली खुशखबर

सर्वात श्रीमंत व्यक्ती Elon Musk झाला 12 व्या मुलाचा बाप! सोशल मीडियावर दिली खुशखबर

Elon Musk : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले इलॉन मस्क (Elon Musk) नेहमी सोशल मीडियावर (Social Media) कोणत्या कोणत्या कारणाने चर्चेत राहत असतात. तर आता एका वेगळ्या कारणामुळे इलॉन मस्क चर्चेत आले आहे.

नुकतंच त्यांनी ते 12व्या अपत्याचे वडील झाले असल्याची माहिती दिली आहे. याच बरोबर मी कोणतीही माहिती लपविण्याचा प्रयत्न करत नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच याबाबत आपल्या मित्रांना आणि कुटुंबीयांना माहिती आहे असं देखील त्यांनी सोशल मीडियावर सांगितले आहे.  त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या या बाळाची आई शिवॉन झिलिस (Shivon Jhillis) आहे.

शिवॉन झिलिस मस्कच्या ब्रेन-इम्प्लांट कंपनी न्यूरालिंकमधील स्पेशल प्रोजेक्ट्सची डायरेक्टर आहेत. मस्कने आतापर्यंत त्यांच्या मुलाचे नाव आणि लिंग जाहीर केलेले नाही तसेच कोणताही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केलेला नाही.

पेज सिक्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये मस्कने या नवीन मुलाच्या जन्माची माहिती कुटूंबाला आणि जवळचे मित्रांना माहिती असून आम्ही फक्त याबाबतची माहिती सार्वजनिक जीवनात दिलेली नाही असं ते म्हणाले. मस्कच्या मुलाच्या जन्माची गुप्तता लपवण्याची ही पहिलीच वेळ नाही. जरी ते सार्वजनिकपणे 11 मुलांचे वडील मानले जातात. पण त्यांनी अधिकृतपणे त्यांच्या मुलांची एकूण संख्या उघड केलेली नाही.

स्ट्रायडर, अझूर आणि त्याच्या सर्वात लहान मुलाचे वडील असण्याव्यतिरिक्त, मस्कला ऑल्ट-पॉप गायिका ग्रिम्सकडून तीन मुले आहे. मस्कने 2002 मध्ये जस्टिन विल्सनसह पहिल्या मुलाचे नेवाडा अलेक्झांडरचे स्वागत केले होते. तथापि, दुर्दैवाने, SIDS मुळे बाळाचा वयाच्या दहाव्या वर्षी अचानक मृत्यू झाला. तर दुसरीकडे ग्रिम्स आणि एलोन मस्क यांच्यात त्यांच्या तीन मुलांच्या ताब्याबाबत न्यायालयात सुनावणी सुरु आहे.

मोठी बातमी! पोर्शे कार अपघात प्रकरणात अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर

काही दिवसापूर्वीच मस्क यांच्या 4 वर्षाच्या मुलासोबत सार्वजनिक ठिकाणी दिसले आहे. फेब्रुवारी महिन्यात लास वेगासमधील सुपर बाउलमध्ये तर जर्मनीतील टेस्ला प्लांटमध्ये मार्च 2024 मध्ये आणि या महिन्याच्या सुरुवातील फ्रान्समधील कान्स लायन्स फेस्टिव्हलमध्ये मस्क आपल्या 4 वर्षाच्या मुलासोबत दिसले होते. काई, सॅक्सन आणि डॅमियन यांच्यसह मस्क ग्रिफीन आणि व्हिव्हियन या जुळ्या मुलांचे वडील आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज