मुंबईत सुरू झालं भारतातील पहिलं टेस्ला शोरूम; नावाच्या पाटीत ‘मराठी’ला प्राधान्य

Tesla Launches First Showroom in India : जगातील प्रसिद्ध इलेक्ट्रिक व्हेईकल कंपनी टेस्लाने (Tesla in India) अखेर भारतात अधिकृत एन्ट्री घेतली आहे. मुंबईतील (Tesla First Showroom in Mumbai)वांद्र कुर्ला कॉम्प्लेक्स येथील Maker Maxity Mall मध्ये कंपनीचे पहिले शोरुम सुरू झाले आहे. विशेष म्हणजे या शोरुममध्ये मराठी भाषेचा वापर करण्यात आला आहे. शोरुमच्या फलकावर ‘टेस्ला’ असे नाव मराठीत दिमाखात झळकत आहे. भारताच्या इलेक्ट्रिक वाहनांच्या बाजारात कंपनीची पहिली मोठी एन्ट्री म्हणून या शोरुमकडे पाहिलं जात आहे.
Model Y सह भारतात एन्ट्री
याठिकाणी Model Y कार उपलब्ध राहिल. या वाहनाची किंमत, वैशिष्ट्ये आणि भविष्यात कंपनीचं काय प्लॅनिंग आहे याची माहिती समोर आली आहे. भारतात टेस्ला कंपनीची सुरुवात Model Y SUV पासून होत आहे. या कारची किंमत साधारण 60 लाख रुपये आहे. दुसऱ्या प्रकारातील Long Range Rear Wheel Drive ची किंमत 68 लाख रुपये आहे.
चीनमधून भारतात आणल्या कार
या करार शांघाय स्थित Gigafactory तून भारतात आणण्यात येत आहे. कंपनीने तब्बल 8.3 कोटी रुपयांचे एक्सेसरीज, सुपरचार्जर आणि इक्विपमेंट देखील चीन आणि अमेरिकेतून आयात केले आहेत. या चार्जर्सना मुबंई शहर आणि आसपासच्या भागात स्थापित केले जाणार आहे. त्यामुळे सुरुवातील कार खरेदी करणाऱ्या ग्राहकांना चार्जिंगच्या बाबतीत कोणतीही अडचण येऊ नये अशी कंपनीची इच्छा आहे.
#WATCH | Tesla is all set to mark its official entry into the Indian market with the launch of its first showroom in Mumbai today
The electric vehicle (EV) giant is opening its India showroom at the Maker Maxity Mall in the city’s Bandra Kurla Complex (BKC) pic.twitter.com/6p0EmgrsHS
— ANI (@ANI) July 15, 2025
भारतात किंमत जास्त असण्याचं कारण..
टेस्लाची लोकप्रिय Model Y SUV कार चीनमधील शांघाय येथून भारतात आणली आहे. यावर मोठ्या प्रमाणात आयात शुल्क आकारण्यात आले आहे. त्यामुळे कंपनीने कारच्या किंमतीत वाढ केली आहे. प्रत्येक कारवर कंपनीला तब्बल 21 लाख रुपयांचा टॅक्स द्यावा लागला आहे. खरंतर कार भारतात पूर्ण तयार होऊनच येत आहे. यांची किंमत 40 हजार डॉलरपेक्षा कमी असते. परंतु, येथे या वाहनांवर थेट 70 टक्के टॅक्स आकारला जातो.
सरकारकडून इतक्या मोठ्या प्रमाणात टॅक्स आकारला जात असल्याने टेस्लाची भारतातील एन्ट्री सरळ ठरलेली नाही. यातच आता टेस्लाला भारतात BYD सारख्या दमदार चीनी कंपन्यांशी स्पर्धा करावी लागणार आहे. BYD आधीपासूनच भारतीय बाजारात उपस्थित आहे. त्यामुळे टेस्लाला भारतात रुजण्यासाठी आणि टिकण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे.
NEW⚡️ : Tesla India Website is now live for all🔋
Visit – https://t.co/xueZVvVL1P https://t.co/MJAC4eteFz pic.twitter.com/wGIrALBlJ2
— Tesla Club India® (@TeslaClubIN) July 15, 2025