पंतप्रधान मोदी घाबरतात…, ट्रम्प यांच्या दाव्यावर 5 कारण देत राहुल गांधींचा हल्लाबोल

Rahul Gandhi On PM Modi : भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही असे आश्वसन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले असा दावा अमेरिकेचे

  • Written By: Published:
Rahul Gandhi On PM Modi

Rahul Gandhi On PM Modi : भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केल्यानंतर आता विरोधक पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना दिसत आहे. यातच काँग्रेस खासदार आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल करत पंतप्रधान मोदी ट्रम्प यांना घाबरतात असं म्हटले आहे.

माध्यमांशी बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदी (PM Modi) यांनी रशियाकडून तेल खरेदी करणार नाही असे आश्वासन दिले असल्याचा दावा केला होता. ट्रम्प (US President Donald Trump) यांच्या दाव्यानंतर देशातील राजकारणात पुन्हा एकदा अनेक चर्चांना उधाण आले असून विरोधक आता चारही बाजून पंतप्रधान मोदींवर टीका करताना दिसत आहे.

काय म्हणाले राहुल गांधी?

डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या दाव्यानंतर राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी एक्स वर पोस्ट करत पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. पंतप्रधान मोदी ट्रम्प यांना घाबरतात असं म्हणत त्यांनी पाच कारणे दिली आहे. त्यांनी एक्सवर म्हटले आहे की, मोदी यांनी ट्रम्प यांना निर्णय घेण्याची आणि भारत रशियन तेल खरेदी करणार नाही अशी घोषणा करण्याची परवानगी दिली. दुसरे कारण म्हणजे त्यांनी वारंवार नकार देऊनही अभिनंदन मेसेज पाठवणे सुरू ठेवले. तिसरे कारण म्हणजे अर्थमंत्र्यांचा अमेरिका दौरा रद्द झाला. चौथे कारण म्हणजे पंतप्रधान मोदी शर्म अल-शेखला उपस्थित राहिले नाहीत. पाचवे कारण म्हणजे त्यांनी ऑपरेशन सिंदूरवर त्यांचा विरोध केला नाही. असं राहुल गांधी यांनी एक्सवर म्हटले आहे.

तर दुसरीकडे काँग्रेसने ट्रम्पचा एक्स वरचा व्हिडिओ शेअर करून पंतप्रधान मोदींवर टीका केली. पोस्टमध्ये लिहिले होते की, नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा देशाच्या सन्मानाशी तडजोड केली आहे. ट्रम्प म्हणतात की त्यांच्या रागाला आणि धमक्यांना घाबरून मोदींनी भारताला आश्वासन दिले की भारत रशियाकडून तेल खरेदी करणार नाही.  नरेंद्र मोदी, रशिया नेहमीच भारताचा महत्त्वाचा मित्र राहिला आहे. तुमचे स्वतःचे “कठोर संबंध” सुधारण्यासाठी देशाचे संबंध बिघडू नका.

Virat Kohli : ‘तुम्ही फक्त तेव्हाच अपयशी ठरता जेव्हा…’, निवृत्ती घोषणा? कोहलीच्या पोस्टमुळे क्रिकेट विश्वात खळबळ

नेमकं काय म्हणाले होते डोनाल्ड ट्रम्प ?

माध्यमांशी बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी असा दावा केला की, पंतप्रधान मोदींनी त्यांना आश्वासन दिले होते की भारत रशियाकडून तेल खरेदी करणे थांबवेल. भारत रशियाकडून (Russia) तेल खरेदी करणार नाही. भारत रशियाकडून तेल खरेदी करत नाही, परंतु रशियासोबत सुरु असलेला तेल व्यापार तात्काळ थांबवणे सोपे नाही, यात एक प्रक्रिया समाविष्ट आहे जी पूर्ण होण्यास वेळ लागेल असं माध्यमांशी बोलताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.

follow us