मोठी बातमी! राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन NDA चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार, नड्डा यांनी केली घोषणा

मोठी बातमी! राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन NDA चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार, नड्डा यांनी केली घोषणा

C.P. Radhakrishnan : जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपतीपदाचा अचानक राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणूक जाहीर झाली. महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन (C.P. Radhakrishnan) हे उपराष्ट्रपतीपदासाठी एनडीएचे (NDA) उमेदवार असणार आहेत. भाजपाचे अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.

मोठी बातमी! राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन NDA चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार, नड्डा यांनी केली घोषणा 

माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी 21 जुलै 2025 रोजी प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले आहे. या निवडणुकीसाठी 9 सप्टेंबर 2025 रोजी मतदान होणार असून एनडीएने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यावर उमेदवार निवडीची जबाबदारी सोपवली होती. दरम्यान, आज सी. पी. राधाकृष्णन यांच्या नावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यात झालेल्या बैठकीत एकमत झाले. त्यानंतर नड्डा यांनी ही घोषणा केली.

सी. पी. राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास
सी. पी. राधाकृष्णन हे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते असून त्यांच्या राजकीय प्रवासात त्यांनी अनेक महत्त्वाची पदे भूषवली आहेत. त्यांनी तमिळनाडूतून खासदार म्हणून देखील काम केले आहे. सध्या ते महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी ते झारखंड, तेलंगणाचे राज्यपाल देखील राहिलेले आहेत. त्यांचा राजकीय अनुभव आणि दक्षिण भारतातील प्रभाव पाहता त्यांना उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी जाहीर झाली आहे.

सरन्यायाधिश गवईंनी इतकं मनावर घेतलं की थेट तारीखच ठरवली, मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला किस्सा 

एनडीएची ताकद
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत लोकसभा आणि राज्यसभेचे 788 खासदार मतदान करतात. यात नामनिर्देशित खासदारांचाही समावेश असतो. एनडीएचे संसदेत बहुमत असल्याने त्यांचा उमेदवार सहज निवडून येण्याची शक्यता आहे. दरम्यान, इंडिया आघाडीही या निवडणुकीत उमेदवार देण्याच्या तयारीत आहे. मात्र, एनडीएच्या संख्याबळामुळे त्यांना यश मिळणे कठीण आहे.

कधी होणार उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक?
निवडणूक आयोगाने उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले. आयोगाच्या परिपत्रकानुसार, २१ ऑगस्ट ही नामांकन अर्ज भरण्याची शेवटची तारीख असेल. त्यानंतर २२ ऑगस्टपर्यंत नामांकन अर्जांची छाननी केली जाईल. तसेच २५ ऑगस्टपर्यंत उमेदवारांना माघार घेता येणार आहे. तर उपराष्ट्रपती पदाची निवडणूक ९ सप्टेंबर होईल आणि त्याच दिवशी संध्याकाळी मतमोजणी होऊन निकालही जाहीर केला जाईल.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube