पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का : लोकसभेचं तिकीट नाकारलेले आबा बागुल फडणवीसांच्या भेटीला

पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का : लोकसभेचं तिकीट नाकारलेले आबा बागुल फडणवीसांच्या भेटीला

पुणे : प्रचाराची धामधुम सुरु असतानाच पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. लोकसभा निवडणुकीत तिकीट नाकारल्याने नाराज असलेले पुण्याचे माजी उपमहापौर, आणि सहा टर्मचे माजी नगरसेवक आबा बागुल (Aaba Bagul) भाजपच्या वाटेवर आहेत. आज (15 एप्रिल) नागपूरमध्ये त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. यांच्या भेटीसाठी गेले आहेत. त्यामुळे याबाबतच्या चर्चांना उधाण आले आहे. (Former Deputy Mayor of Pune, and former six-term corporator Aba Bagul to join BJP?)

काँग्रेसने पुणे लोकसभा निवडणुकीसाठी कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदेवारी दिली आहे. मात्र त्यापूर्वी आबा बागुल यांनी पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली होती. त्याबाबत त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पत्रही लिहिले होते. मात्र धंगेकर यांना उमेदवारी दिल्यानंतर बागुल कमालीचे नाराज झाले होते. त्यांनी आपली नाराजी जाहीररित्या बोलूनही दाखविली होती. निष्ठेची हत्या असा व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवला होता. त्यानंतर काँग्रेस भवनावर मोर्चाही काढला होता.

चार्टर्ड प्लेन अन् दिमतीला खास नेते, उत्तम जानकरांच्या मनधरणीसाठी दिल्लीपर्यंत खास नियोजन

मी कोणाच्याही चपला उचलणार नाही. राहुल गांधी एका बाजूला न्याय यात्रा काढतात मग निष्ठावंतांना न्याय मिळणार की नाही?40 वर्ष काम करणाऱ्यांना तिकीट दिले नाही. आता आलेले आणि आमदार झालेले, त्यांना तिकीट दिले. ते शिवसेनेतून मनसेत गेले, तिथून काँग्रेसमध्ये आले. कसबा पोटनिवडणुकीत उमेदवारी दिली. त्यांना आम्ही आणि पक्षाने मेहनत करून निवडून आणले, असे बागुल यांनी तिकीट नाकारल्यानंतर म्हटले होते. त्यानंतर आता ते भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.

IP अ‍ॅड्रेस कॅनडाचा तर, कट अमेरिकेत; सलमानवरील हल्ल्याचा असा होता ‘मास्टर प्लॅन’

आबा बागुल हे मागील 40 वर्षांपासून काँग्रेस पक्षात सक्रिय आहेत. या काळात ते सहा टर्म नगरसेवक म्हणून निवडून आले होते. या दरम्यान, एकदा त्यांची उपमहापौरपदी वर्णी लागली होती. याशिवाय ते सुरेश कलमाडी यांचे खंदे समर्थक मानले जातात. त्यांच्यासाठी त्यांनी स्थायी समितीचे अध्यक्ष पद सोडले होते. पर्वती भागातही बागुल यांची मोठी ताकद आहे. असे असतानाही काँग्रेसने आपल्याला मोठी संधी दिली नाही, असा त्यांचा दावा असून त्यामुळे ते नाराज असल्याचे सांगितले जाते. अशात ते जर भाजपमध्ये गेले तर महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना फायदा होण्याची शक्यता आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

वेब स्टोरीज