तितका खर्च आम्ही फक्त 1 वर्षात करतो, मोदींचा पुण्यातून काँग्रेसवर हल्लाबोल 

तितका खर्च आम्ही फक्त 1 वर्षात करतो, मोदींचा पुण्यातून काँग्रेसवर हल्लाबोल 

Narendra Modi In Pune : पुण्यातील भूमीला माझा नमस्कार म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Modi) विरोधकांवर हल्लाबोल केला. आज (29 एप्रिल) रोजी पुणे (Pune) जिल्ह्यातील चारही महायुतीच्या (Mahayuti) उमेदवारांच्या प्रचारार्थ मोदींनी जाहीर सभा घेतली. या जाहीर सभेत बोलताना मोदींनी काँग्रेसवर जोरदार टीका केली.

मोदी म्हणाले, काँग्रेसने देशात 60 वर्ष राज्य केले मात्र तरीही देखील देशातील अनेक लोकांकडे काहीच सुख सुविधा नव्हती मात्र आम्ही गेल्या 10 वर्षात यावर काम केले आहे. मनमोहन सरकारने 10 वर्षात जितका विकासावर खर्च केला तितका खर्च आम्ही फक्त 1 वर्षात करतो असं मोदी म्हणाले. आज देश विकासाच्या मार्गावर असून स्टार्टअप इंडियात (Startup India) लोकांनी 10 वर्षात सव्वा लाखांपेक्षा जास्त स्टार्टअप बनवले आहे.  आमच्या सरकारने देशात गरीबांच्या बचतीसाठी काम केली आहे आणि आता तो दिवस दूर नाही जेव्हा तुम्ही बुलेट ट्रेनने प्रवास करणार.  रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म हे मोदी सरकारचं  मिशन असून त्याचा परिणाम आता दिसत असल्याचं नरेंद्र मोदी म्हणाले.

काँग्रेसच्या काळात भारत मोबाईलची आयात करायचा मात्र आम्ही सत्तेत आल्यानंतर भारत मोबाईल निर्यात करतो, आता  मेड इन इंडिया चिपही निर्यात केली जाणार असून भारताच्या तंत्रज्ञानावर विश्वास आहे. यामुळे येणाऱ्या काही वर्षात  पुणे ऑटोमोबाईल हब बनेल, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला आहे.

महाराष्ट्र भटकत्या आत्माचा शिकार, कुटुंबातही तसेच केले; नरेंद्र मोदींचा शरद पवारांवर निशाणा

काँग्रेस सरकारने तुमच्याकडून महागाई आणि भ्रष्टाचारचा डबल टॅक्स घेतला. आम्ही सत्तेत आल्यानंतर महागाईवर नियंत्रण आणले आणि  भ्रष्टाचारवर मोठी कारवाई केली. आम्ही आयकरची मर्यादा वाढवली. जन औषधी केंद्रामुळे गरिबांची मदत होत आहे. तर आता देशात 70 वर्षापेक्षा जास्त वयोगटातील लोकांना मोफत उपचार मिळणार ही मोदींची गॅरंटी आहे असं देखील मोदी म्हणाले.

नारायण राणेंसाठी राज ठाकरे मैदानात! कणकवलीत घेणार सभा

follow us
  • fb
  • instagram
  • youtube