Raj Thackeray :  नारायण राणेंसाठी राज ठाकरे मैदानात! कणकवलीत घेणार सभा

Raj Thackeray :  नारायण राणेंसाठी राज ठाकरे मैदानात! कणकवलीत घेणार सभा

Raj Thackeray Latest Update : 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी मनसे (MNS) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray ) यांनी महायुतीला (Mahayuti) बिनशर्त पाठिंबा जाहीर केल्यानंतर आता राज ठाकरे महायुतीच्या प्रचारासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. राज ठाकरे केंद्रीय मंत्री आणि रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा (Ratnagiri-Sindhudurga Lok Sabha ) मतदारसंघात भाजपचे उमेदवार नारायण राणे (Narayan Rane) यांच्यासाठी प्रचार सभा घेणार आहे.

माहितीनुसार, नारायण राणे यांच्यासाठी प्रचारार्थ कणकवलीत 4 मे रोजी संध्याकाळी पाच वाजता राज ठाकरे जाहीर सभा घेणार आहे. या सभेत राज ठाकरे काय बोलणार याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

आतापर्यंत राज्यातील 13 मतदारसंघात निवडणुकीची प्रक्रिया पार पडली असून महायुतीच्या नेत्यांकडून या मतदारसंघात जोरदार प्रचार देखील करण्यात आला होता मात्र राज ठाकरे या प्रचारपासून दूर होते मात्र आता राज ठाकरे देखील महायुतीच्या प्रचारासाठी मैदानात उतरणार असून आपली पहिली सभा 4 मे रोजी घेणार आहे.

रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात भाजपकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे तर महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे विनायक राऊत (Vinayak Raut) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यामुळे या मतदारसंघात कोण बाजी मारणार याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.

या लोकसभा मतदारसंघात गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गट आणि भाजपमध्ये आरोप – प्रत्यारोप होताना दिसत आहे. यातच आता राज ठाकरे देखील मैदानात उतरणार असल्याने नारायण राणे यांच्या प्रचाराला धार चढणार आहे.

उदयनराजेंसाठी मोदी साताऱ्यात! काँग्रेसवर हल्लाबोल, म्हणाले, 500 कोटींचा झुनझुना…

पंतप्रधान मोदी याना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात महायुतीला बिनर्शत पाठिंबा देण्याची घोषणा केली होती. मात्र या लोकसभा निवडणुकीत मनसेकडून कोणताही उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube