‘निवडणुकीनंतर ठाकरेंचे दहा आमदार फुटणार’; नारायण राणेंचा खळबळजनक दावा

‘निवडणुकीनंतर ठाकरेंचे दहा आमदार फुटणार’; नारायण राणेंचा खळबळजनक दावा

Narayan Rane on Uddhav Thackeray : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू झाली आहे. कडाक्याच्या उन्हाळ्यात प्रचारही तापू लागला आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात यंदा (Ratnigiri Sindhudurg) अटीतटीची लढत होणार आहे. शिवसेनेकडून हा मतदारसंघ मिळवत भाजपने येथे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना (Narayan Rane) तिकीट दिलं आहे. त्यांच्यासमोर ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांचं आव्हान आहे. याच दरम्यान राणे यांनी एक खळबळजनक दावा केला आहे ज्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे.

राणे यांनी रत्नागिरीत माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हा दावा केला. राणे म्हणाले, लोकसभा निवडणुकीत माझा अडीच ते तीन लाखांच्या मताधिक्याने विजय होणार आहे. मी निवडून आलो तर पुन्हा मला कॅबिनेट मंत्रिपद मिळेल. लोकसभा निवडणुकीनंतर ठाकरे गटाचे दहा आमदार शिंदे गटात जातील असा दावा नारायण राणे यांवी केला. यानंतर ठाकरे गटाकडे जे सहा आमदार राहतील त्यापैकी किती त्यांच्यासोबत राहतील हे आताच सांगता येणार नाही. पण, पुढील वेळच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंना नक्कीच सुट्टी मिळेल असा खोचक टोला नारायण राणे यांनी लगावला.

नारायण राणेंकडून प्रचाराला सुरूवात, रत्नागिरी-सिधुदुर्गवर आमचाच हक्क; उदय सामंतांनी ठणकावलं

दरम्यान, रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून शिवसेनेकडून किरण सामंत (Kiran Samant) इच्छूक होते. मात्र, आता महायुतीकडून नारायण राणेंना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे आता कोकणात ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत आणि नारायण राणेंमध्ये थेट लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. किरण सामंत माघार घेत असल्याचे उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले होते. त्यांनी हे जाहीर करता लगेचच रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर झाली.

उमेदवारीपूर्वी राणेंनी फोडला प्रचाराचा नारळ

महायुतीत सर्वाधिक वादग्रस्त ठरत असलेल्या मतदारसंघापैकी रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघ (Ratnagiri Sindhudurg Lok Sabha) होता. या मतदारसंघात शिंदे गटाने किरण सामंत यांच्यासाठी तर भाजपने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासाठी दावा ठोकला होता. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून या ठिकाणी कुणाला उमेदवारी दिली जाते याकडे सर्वांचा नजरा लागल्या होत्या. एकीकडे उमेदवारी जाहीर होत नसल्याने दोन्ही गटात टेन्शनचं वातावरण होतं. तर, उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच राणेंनी प्रचाराचा नारळ फोडला होता. त्यांच्या या भूमिकेमुळे शिंदे गटातील अस्वस्थता वाढली होती.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज