‘रत्नागिरीवरील दावा सोडलेला नाही, सोडणारही नाही’; सामंतांनी पुन्हा ठणकावलं

‘रत्नागिरीवरील दावा सोडलेला नाही, सोडणारही नाही’; सामंतांनी पुन्हा ठणकावलं

Uday Samant on Ratnagiri Sindhudurg Lok Sabha : महायुतीत तिढा असलेल्या मतदारसंघात रत्नागिरी सिंधुदुर्गचाही समावेश आहे. या मतदारसंघात कुणाला उमेदवारी द्यायची, मतदारसंघ कुणाकडे जाईल याबाबत काहीच निश्चित नाही. या मतदारसंघावर भाजपने दावा केला आहे. तर दुसरीकडे शिंदे गटही दावा सोडायला तयार नाही. आज पुन्हा एकदा शिंदे गटाचे नेते उद्योगमंत्री उदय सामंत यांनी (Uday Samant) या मतदारसंघावर दावा सांगितला. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या रत्नागिरी (Narayan Rane) सिंधुदुर्गाची जागा भाजपाच लढवणार या वक्तव्याचाही त्यांनी समाचार घेतला.

Narayan Rane vs Ashok Chavan : 16 वर्षे झाली ‘अशोकाचं ‘झाड’ राणेंचा पिच्छा सोडेना..

मंत्री उदय सामंत यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघावर त्यांनी दावा सांगितला. सामंत म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमत्री अजित पवार हे तिन्ही नेते आम्हाला विश्वासात घेऊनच निर्णय घेतील. कोणत्या उमेदवाराची निवडून येण्याची क्षमता आहे यावरच निकष असून या मतदारसंघात आजही शिवसेनेचाच वरचष्मा आहे. याआधी श्रीकांत शिंदे यांच्या (Shrikant Shinde) विरोधात डरकाळी फोडणारे कुठे गेले, अस सवाल त्यांनी आदित्य ठाकरे यांना केला.

मतदारसंघात निवडून येणे हाच निकष आहे. किरण सामंत हेच शिवसेनेचे खासदारकीचे उमेदवार राहतील. त्यामुळे आम्हाला सल्ला आणि मार्गदर्शनाची काहीच गरज नाही अशा शब्दांत सामंत यांनी विनायक राऊत यांना सुनावले. सर्वच मतदारसंघात आमच्याकडे तिकीटांसाठी गर्दी झाली आहे. आमच्याकडे घटक पक्ष दावा करत असले तरी निवडून येण्याची क्षमता हाच निकष आहे. त्याच उमेदवाराला तिकीट दिले जाईल. त्यामुळेच आम्ही मतदारसंघावरचा दावा सोडलेला नाही आणि सोडणारही नाही, असे सामंत म्हणाले.

नारायण राणेंकडून प्रचाराला सुरूवात, रत्नागिरी-सिधुदुर्गवर आमचाच हक्क; उदय सामंतांनी ठणकावलं

दरम्यान, या जागेवर नारायण राणेंनी दावा (Narayan Rane) केला असला तरी शिवसेनेने अजूनही या मतदारसंघावरील आपला दावा कायम ठेवला आहे. किरण सामंत यांना उमेदवारी देण्यात यावी, याबाबत कार्यकर्ते अजूनही आक्रमक आहेत. त्यामुळं रत्नागिरी-सिंधुदुर्गची जागा कोणत्या पक्षाकडे जाणार हेच पाहणं महत्वाचं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube