Uday Samant : ..म्हणून गोगावलेंनी स्वतःहून मंत्रिपद नाकारलं; सामंतांनी केला मोठा दावा
Uday Samant : राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा सुरू झाल्या की मंत्रिपदासाठी सगळ्यात आधी शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले (Bharat Gogawale) यांचं नाव घेतलं जातं. कारण, त्यांना मंत्रिपदाने सतत हुलकावणी दिली. मंत्रिपद मिळेल असे वाटत असतानाच अजित पवार गटाची एन्ट्री झाली आणि गोगावलेंचं मंत्रिपद पुन्हा लांबणीवर पडलं. अशातच आता त्यांच्या मंत्रिपदावरून उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी मोठा खुलासा केला आहे. राज्यात ज्यावेळी शिंदे-भाजप सरकार स्थापन करायचे होते त्यावेळी कुणाला मंत्रिपद द्यायचं असा प्रश्न होता त्यावेळी भरत गोगावले यांनी सरकार बनवण्यासाठी स्वतःहून मंत्रिपद नाकारलं होत, असं वक्तव्य सामंत यांनी केलं.
Uday Samant : गद्दारांना धडा शिकवण्यासाठी निवडणूक कुठुनही लढेल; भास्कर जाधव असे काेणाबाबत म्हणाले ?
मंत्री सामंत काल रायगड दौऱ्यावर होते. यावेळी आमदार गोगावले देखील त्यांच्यासोबत होते. येथे एका कार्यक्रमात दोघांनीही हजेरी लावली. यावेळी सामंत यांनी आपल्या भाषणात गोगावलेंच्या मंत्रिपदाबाबत मोठा खुलासा केला. सामंत म्हणाले, राजकारणात आज कुणाला कोणतंही पद मिळवायचं असेल कर कधी तो दुसऱ्यासाठी माघार घेत नाही. ज्या दिवशी शिंदे फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार होता. त्यावेळी मी शिंदे साहेब आणि गोगावले पहाटे चार वाजचा चर्चा करत होतो. त्यावेळी कुणाला मंत्रिपद द्यायचं असा प्रश्न शिंदे यांच्यासमोर होता. त्यावेळी गोगावले म्हणाले होते की जर तुम्हाला अडचण होत असेल, मानसिक त्रास होत असेल तर मला मंत्रिमंडळात घेऊ नका. तुम्ही मुख्यमंत्री झालात म्हणजे मीच मुख्यमंत्री झाल्यासारखं आहे.
सामंत यांच्या वक्तव्यानंतर उपस्थित सारचे चकीत झाले. आता मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत. सरकारचा आता शेवटचा टप्प्यातील कार्यकाळ सुरू आहे. थोड्याच दिवसांत लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता जाहीर होईल. त्यानंतर लगेचच राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे आता तरी गोगावलेंना मंत्रिपदाची खुर्ची मिळणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
पालकमंत्रिपद माझी वाट पाहतंय; गोगावले प्रचंड आशावादी, मंत्रिमंडळ विस्ताराची वेळही सांगितली