Devendra Fadanvis यांनी जाहीर सभेतच दिली गुडन्यूज; जात प्रमाणपत्र वैध ठरताच राणा भावूक

Devendra Fadanvis यांनी जाहीर सभेतच दिली गुडन्यूज; जात प्रमाणपत्र वैध ठरताच राणा भावूक

Devendra Fadanvis Gives good News Navneet Rana : देवेंद्र फडणवीसांनी ( Devendra Fadanvis ) अमरावती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा ( Navneet Rana) यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेतली. त्यावेळी त्यांनी सभेच्या सुरूवातीलाच न्यायालयाने ( Supreme Court ) नवनीत राणा यांचे प्रमाणपत्र वैध ठरवले. ही गुडन्यूज दिली. त्यावेळी राणा भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.

ऑस्करच्या अधिकृत पेजवर दीपिका बनली ‘दीवानी मस्तानी’; पती रणवीर सिंगने केली ‘ही’ कमेंट

यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की, सर्वप्रथम मी तुम्हाला एक खुशखबरी देणार आहे. एक अत्यंत चांगली घटना घडली आहे. नवनीत राणांवर जे लोक बोटं उचलत होते. त्यांना सुप्रीम कोर्टाने उत्तर दिले आहे. नवनीत राणा यांच्या (Navneet Rana) जातवैधता प्रमाणपत्र प्रकरणात आज सुप्रीम कोर्टाने निकाल (Supreme Court) दिला. फडणवीसांनी ही गुडन्यूज दिली. त्यावेळी राणा भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.

काँग्रेसला टोचणारी ठाकरे-राऊतांची दोन वक्तव्ये; ‘सांगली’ काँग्रेसच्या हाताला लागणार नाही?

तर पुढे राणा यांच्या प्रचारार्थ बोलताना फडणवीस म्हणाले की, शक्ती संपवण्याचा प्रयत्न करणारे राहुल गांधी असतील किंवा नवनीत राणा यांना हनुमान चालीसा म्हटली म्हणून बिना पाण्याचं आणि बिना बाथरूमचं उभं ठेवणारे, 14 दिवस जेलमध्ये ठेवणारे महाविकास आघाडीचे नेते संपतील. पण आम्हाला ते संपवू शकणार नाही. हे सांगायला मी इथे आलोय. ही निवडणूक नवनीत राणा महापालिका किंवा ग्रामपंचायतची नाही तर देशाचा नेता निवडण्याची निवडणूक आहे. तर जनतेने ठरवला आहे. मोदींच्या हातात देशाची कमान द्यायची आहे.

नगरी राजकारण तापलं! विखेंना ताकद देण्यासाठी अजितदादांच्या राष्ट्रवादीचा आज मेळावा

तसेच मोदींनी महिला कल्याणाचा अजेंडा हाती घेतला आहे. त्यामुळे रवी राणा लक्षात ठेवा पुढच्या जमाना तुमचा नाही. नवनीत राणांचा आहे. त्यामुळे मंचावरील अर्धे लोक 2029 ला नसतील. कारण अर्ध्या महिला या ठिकाणी असतील. लोकसभेत आणि विधानसभेत 33 टक्के महिला असतील पंतप्रधान मोदी महिला राज आणणार आहेत.

त्यामुळे नवनीत राणांना दिलेलं मत मोदींना असेल तर इतर उमेदवाराचे मत राहुल गांधीला असेल त्यामुळे नवनीत राणांना मत देऊन रेकॉर्ड्स मतांनी निवडून आणा. कारण त्या पाच वर्षे एकही दिवस घरी बसलेल्या नाहीत. जंगलातील आदिवासींपर्यंत त्या पोहोचल्या आहेत. असं आवाहन वेगळी मतदारांना फडणवीस यांनी केलं.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

वेब स्टोरीज