ऑस्करच्या अधिकृत पेजवर दीपिका बनली ‘दीवानी मस्तानी’; पती रणवीर सिंगने केली ‘ही’ कमेंट

ऑस्करच्या अधिकृत पेजवर दीपिका बनली ‘दीवानी मस्तानी’; पती रणवीर सिंगने केली ‘ही’ कमेंट

The Academy Share Deepika Padukone Deewani Mastani Song: अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेसने दीपिका पदुकोणच्या (Deepika Padukone) ब्लॉकबस्टर ऐतिहासिक चित्रपट बाजीराव मस्तानीचा व्हिडिओ शेअर करून सर्वांना आश्चर्यचकित केले. शेअर केलेल्या क्लिपमध्ये चित्रपटाचे गाणे दिवानी मस्तानीचे आहे. यामध्ये दीपिका डान्स करताना दिसत आहे. अकादमीने (The Academy ) शेअर केलेल्या या व्हिडिओ क्लिपवर दीपिकाचा पती अभिनेता रणवीर सिंहनेही (Deepika Padukone) आपली प्रतिक्रिया दिली.

अकादमीने ‘दिवानी मस्तानी’चा व्हिडिओ शेअर केला

अकादमीच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलने बॉलीवूड अभिनेत्रीच्या ‘दीवानी मस्तानी’ ( Deewani Mastani Song) या लोकप्रिय गाण्याचा व्हिडिओ आपल्या पेजवर शेअर केला आहे. श्रेया घोषालने गायलेला ‘दीवानी मस्तानी’ हा चित्रपट निर्माता संजय लीला भन्साळी यांच्या बाजीराव मस्तानी या चित्रपटातील हिट ट्रॅक आहे. या चित्रपटात दीपिका पदुकोणशिवाय रणवीर सिंग (Ranveer Singh) आणि प्रियांका चोप्रा यांच्याही मुख्य भूमिका होत्या.

व्हिडिओ शेअर करताना अकादमीने लिहिले की, “दीपिका पदुकोण ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटातील “दीवानी मस्तानी” गाणं सादर करत आहे.” हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. हिंदी सिनेमाला ओळखल्याबद्दल ऑस्करचे आभार मानताना, दीपिका पदुकोणनेही तिच्या इन्स्टा स्टोरीवर ही पोस्ट शेअर केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by The Academy (@theacademy)


रणवीर सिंगनेही प्रतिक्रिया दिली

दीपिका पदुकोणचा पती आणि अभिनेता रणवीर सिंगनेही अकादमीने शेअर केलेल्या व्हिडिओवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. रणवीरने कमेंट बॉक्समध्ये लिहिले आहे की, “मेस्मरिक.” रणवीर सिंहने ‘बाजीराव मस्तानी’मध्ये पेशवा बाजीरावांची भूमिका साकारली होती.

Chandu Champion साठी कार्तिक आर्यन गिरवतोय मराठीचे धडे!

दीपिका पदुकोण 95व्या अकादमी पुरस्कार सोहळ्यात सादरकर्ता होती

गेल्या वर्षी दीपिका पदुकोण 95 व्या अकादमी पुरस्कार सोहळ्यात जॉन ट्रावोल्टा, हॅले बेरी आणि हॅरिसन फोर्ड सारख्या सेलिब्रिटींसह प्रस्तुतकर्ता होती. दीपिकाने ‘RRR’ मधील ऑस्कर विजेते गाणे ‘नातू नातू’चा परफॉर्मन्स सादर केला होता.

दीपिका पदुकोण वर्क फ्रंट

दीपिका पदुकोणच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेत्रीचा शेवटचा रिलीज होता हृतिक रोशनसोबतचा ‘फाइटर’. ‘फाइटर’ हा 2024 मधील आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे. दीपिका आता Clki 2898 AD मध्ये प्रभाससोबत दिसणार आहे. रोहित शेट्टीच्या सिंघम अगेनमध्येही दीपिका पदुकोण दिसणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

वेब स्टोरीज