Supreme Court च्या आदेशानंतर अखेर स्टेट बँकेने निवडणूक आयोगाला पाठवला इलेक्ट्रोल बॉन्ड्सचा तपशील

Supreme Court च्या आदेशानंतर अखेर स्टेट बँकेने निवडणूक आयोगाला पाठवला इलेक्ट्रोल बॉन्ड्सचा तपशील

Supreme Court : सुप्रीम कोर्टाच्या ( Supreme Court ) कडक आदेशानंतर अखेर भारतीय स्टेट बँकेने आज (मंगळवारी) संध्याकाळी अखेर निवडणूक आयोगाकडे इलेक्ट्रोल बॉन्ड्सचा तपशील जमा केला आहे. बँकेचे अध्यक्ष आणि प्रबंधक निर्देशक यांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केल्याची प्रतिज्ञापत्र सादर केले. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार हा डेटा शुक्रवारी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत पोल पॅनलद्वारे एकत्रित जारी करण्यात येणार आहे.

Lok Sabha Election 2024 : एबीपी सी वोटरचा ओपिनियन पोल जाहीर, दक्षिणेत भाजपची वाट बिकटच!

सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) स्टेट बँक ऑफ इंडियाला मोठा झटका देत इलेक्ट्रोल बॉन्डची (electoral bonds) माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाला तात्काळ देण्याचे आदेश दिले होते. “आम्ही 15 फेब्रुवारी रोजी याबाबतचे आदेश दिले होते. तुम्ही 26 दिवस काय केले?” असा सवाल करत स्टेट बँक ऑफ इंडियाला न्यायालयाने कडक शब्दात फटकारले होते. यावर स्टेट बँकेने तीन आठवड्यात माहिती देतो, असा दावा केला. पण त्यानंतरही न्यायलयाने स्टेट बँकेवर ताशेरे ओढत, ही माहिती तात्काळ देण्याचे आणि आदेशाचे पालन करण्याचे आदेश दिले होते.

Ahmednagar Loksabha : निलेश लंके खरंच ‘तुतारी’ फुंकणार का ? राजकारणात काहीही होऊ शकते पण…

सर्वोच्च न्यायालयाने 15 फेब्रुवारी रोजी इलेक्ट्रोल बॉन्ड अर्थात निवडणूक रोख्यांची पद्धत घटनाबाह्य ठरवत रद्द केली होती. त्यानंतर 12 एप्रिल 2019 ते 15 फेब्रुवारी 2024 मिळालेल्या देणग्यांची माहिती सहा मार्चपर्यंत निवडणूक आयोगाला सादर करण्याचे आदेश दिले होते. तसचे न्यायालयाने निवडणूक आयोगाला ही माहिती 13 मार्चपर्यंत आपल्या वेबसाईटवर अपलोड करण्यास सांगितले होते. मात्र स्टेट बँकेने ही माहिती (Electoral Bonds) देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून (Supreme Court) 30 जूनपर्यंत मुदतवाढ मागितली होती. त्यावर सोमवारी सुनावणी झाली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज