Navneet Rana : ‘नवनीत राणांवर रेकी आम्ही उडवणारच…’; नेमकं प्रकरण काय?

Navneet Rana : ‘नवनीत राणांवर रेकी आम्ही उडवणारच…’; नेमकं प्रकरण काय?

Navneet Rana : मागील काही दिवसांपासून अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी संसदेत हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन मोठा गदारोळ केल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यानंतर नवनीत राणा यांना पाकिस्तान आणि अफगाणिस्तानवरुन धमकीचे फोन सुरु झाले असल्याचा दावा आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी केला आहे. दरम्यान, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आवाज उठवल्यानेच अशा धमक्या येत असल्याचंही आमदार रवी राणा यांनी स्पष्ट केलं आहे. या प्रकारानंतर राणा यांनी माध्यमांशी संवाद साधला असून यावेळी बोलताना त्यांनी संपूर्ण A To Z सांगून टाकलं आहे.

जितक्या जागा शिंदेंना, तितक्याच राष्ट्रवादीलाही द्या; भुजबळांच्या वक्तव्याने जागावाटपात ट्विस्ट!

रवी राणा म्हणाले, काही दिवसांपूर्वी संसदेत खासदार नवनीत राणा यांनी हिंदुत्वाचे विचार श्रीरामाचे नाव घेऊन मांडले होते. त्यावेळी संसदेत असदुद्दीन औवेसींनी त्यांचा कडाडून विरोध होता. विरोधात औवेसींनी बाबरी मशिदीचा उल्लेख करुन आक्रोश द्वेष व्यक्त करुन दाखवला होता. या प्रकारानंतर थेट भाषणातून इम्तियाज जलील यांनी राणा यांना दम देत कडक शब्दांत इशाराही दिला असल्याचं रवी राणा यांनी सांगितलं आहे.

तीन मित्रांची गोवा ट्रीप आणि…; कॉमेडीचा तडका…,’मडगाव एक्सप्रेस’चा ट्रेलर रिलीज

या प्रकारानंतर राज्यातील अनेक कार्यकर्त्यांनी राणा यांना धमक्या दिल्या. मात्र आम्ही अशा धमक्यांना भीक घातली नसल्याचं रवी राणांनी सांगितलं आहे. एवढं सगळं घडत असतानाच आज पाकिस्तान आणि अफगाणिस्तानवरुन धमकीचे फोन सुरु झाले आहेत. धमकीच्या फोनमध्ये धमकी देणारे म्हणतात, आम्ही नवनीत राणा यांना उडवून देऊ, तसेच भाजपच्या बड्या नेत्यांनाही उडवून देणार आहोत. देशभरात बॉम्बस्फोट घडवून आणू, सध्या आम्ही राणांच्या कार्यक्रमांची रेखी करत असून पुढील काळात राणा कुठे उडवून जातील दिसणारही नाहीत अशा धमक्या येत असल्याचा दावा रवी राणआ यांनी केला आहे.

दरम्यान, या प्रकारानंतर इम्तियाज जलील, असदुद्दीने औवेसी यांचा काही संबंध आहे? याबाबत तपास करण्याची मागणी पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्यासह गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रीय तपास यंत्रणांकडे केली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा पूर्ण तपास करुन आरोपींवर कारवाई करणार असल्याचा पूर्ण विश्वास यावेळी रवी राणा यांनी व्यक्त केला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज