“..तर सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होतील”, आमदार रवी राणांनी सांगितलं महायुतीचं गणित

Ravi Rana ON NCP : मागील काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (Maharashtra Local Body Elections) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या चर्चांनी जोर धरला आहे. सत्ताधारी महायुतीतील नेते, आमदार आणि मंत्री या मुद्द्यावर प्रतिक्रिया देत आहेत. यातच आता राष्ट्रीय युवा स्वाभिमान पक्षाचे नेते आणि आमदार रवी राणा यांनी (Ravi Rana) मोठा दावा केला आहे.
रवी राणा म्हणाले, आगामी काळात राज्याच्या राजकारणात मोठे बदल दिसतील. महायुती केंद्रस्थानी असेल. शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे केंद्रीय पातळीवर एकत्र आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर शरद पवारही (Sharad Pawar) दिसतील. खासदार सुप्रिया सुळे या केंद्रात मंत्री दिसतील, असा दावा रवी राणा यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्याची राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
मिठीच्या घोटाळ्यामध्ये गुन्हे दाखल होणार; आमदार रवी राणांचा ठाकरे पिता-पुत्रांना इशारा
याआधी राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनीही प्रतिक्रिया दिली होती. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रच आहेत. त्यांचं दोघांत आय लव यू आहे अशी प्रतिक्रिया मंत्री पाटील यांनी दिली होती. त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. अजित पवार आमदारांचा एक मोठा गट घेऊन महायुतीत आले होते. तेव्हापासून शिंदे गटातील नेते नाराज असल्याची चर्चा होत आहे.