नवनीत राणांना केवळ आमंत्रण पण, त्यांचा पक्षप्रवेश नाही; चर्चांना बावनकुळेंचा फुलस्टॉप

  • Written By: Published:
नवनीत राणांना केवळ आमंत्रण पण, त्यांचा पक्षप्रवेश नाही; चर्चांना बावनकुळेंचा फुलस्टॉप

नागपूर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्या भाजप प्रवेशानंतर अनेक राजकीय गणित बदलली आहेत. त्यात गेल्या काही दिवसांपासून अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा (Navneet Rana) भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु आहे. मात्र, आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. राणा आणि भाजपच्या सर्व मित्र पक्षांना आम्ही युवा राष्ट्रीय संमेनाला बोलावले असल्याचे बावनकुळेंनी स्पष्ट करत नवनीत राणांचा कुठलाही पक्षप्रवेश होणार नसल्याचे म्हटले आहे. नवनीत राणा संमेलनाला सहयोगी म्हणून ते येत असल्याचे बावनकुळेंनी सांगितले. (Chandrashekhar Bwankule On Navneet Rana BJP Joining)

फिट असणं हे निरोगी असणं नाही, दहा हजार पावलं चालला तरी…; नितीन कामथच्या सहकाऱ्याची पोस्ट

पंतप्रधान जेव्हाही ज्या ज्या विमानतळावर थांबतात तेथे जरी वेळ कमी असला तरीस आमचे बूथ प्रमुख, केंद्रप्रमुख, तालुकाप्रमुख, भजन मंडळ प्रमुख, सामाजिक संस्थांचे प्रमुख अशा कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी नरेंद्र मोदी संवाद साधतात. त्याप्रमाणे मोदींना नांदेडमध्येही 35 कार्यकर्ते भेटणार आहेत. महाराष्ट्रातला जवळपास 60 हजारांच्यावर युवक आणि विदर्भात तीस हजार असे एक लाख युवकांचे संमेलन असून, नमो युवा संमेलनात राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या अतिव्यस्त बैठकांमुळे आज ते नमो युवा संमेलनाला येणार नाहीत. मात्र, स्मृती इराणी, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, तेजस्वी सूर्य हे या नमो संमेलनाला उपस्थित राहणार आहेत.

मोठी बातमी : खासदार, आमदारांची खैर नाही; लाच घेऊन मतदान अन् भाषण करणाऱ्यांवर चालणार खटला

नुकतीच भाजपकडून 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यावर बोलताना बावनकुळे म्हणाले की, महाराष्ट्राचा क्रमांक जेव्हा येईल तेव्हा महायुतीच्या जागावाटप केल्या जातील. त्यानंतर महाराष्ट्रातील उमेदवारांची यादी जाहीर होईल. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या तिघांच्या एकत्रित चर्चेनंतर जागा वाटप होईल. प्रत्येकाला आपापल्या जागा मागण्याचा अधिकार असल्याचेही ते म्हणाले. शेवटी निवडून येणे हा महत्त्वाचा निवडणुकीमध्ये विषय असतो. निवडून येण्याकरिता काय काय बाबी करावी लागेल. त्यातून निर्णय होतील आणि मग पुढे जाईल, असं म्हणत जागा वाटपाच्या मुद्द्यावर बावनकुळेंनी प्रतिक्रिया दिली.

नुकतीच भाजपकडून 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली. यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी स्थान न देण्यात आल्याने आनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते. यावर बोलताना बावनुकुळे म्हणाले की, अद्याप राज्यातील कोणताही सीट जाहीर झालेली नाही. ही बाब छोट्या बालकालासुद्धा कळत आहे. महाराष्ट्रातला संपूर्ण जागा वाटपाचा निर्णय अजून व्हायचा आहे. त्यामुळे गडकरींचे नाव आले नाही म्हणून वेगळ्या चर्चांना तोंड फोडण्यास अर्थ नाही. राजकारणासाठी बोलायचं आणि राजकीय फायदा घ्यायचा हे योग्य नसल्याचेही ते म्हणाले.

घड्याळ बंद पडले की काय? अमोल कोल्हेंचा अजितदादा गटाला खोचक टोला

लोकसभेचं मैदान हे फक्त नवनीत राणाचं नाही

लोकसभेचं मैदान हे फक्त नवनीत राणाचं नाही, सगळ्यांना लढण्याचा अधिकार असल्याचे खासदार नवनीत राणा यांनी म्हटले आहे. नागपूरमधील संमेलनासाठी मला एनडीएचा घटक म्हणून निमंत्रण देण्यात आले आहे. व्यासपीठ जरी भाजपचं असलं तरी मी त्यांच्यासोबतच आहे. लोकसभेचं मैदान हे फक्त नवनीत राणाचं नाही, सगळ्यांना लढण्याचा अधिकार आहे, मी लढणार आहे हे निश्चित असल्याचेही राणा म्हणाल्या. मी पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सोबतच आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज