महानगरपालिका निवडणूकीच्या आधीच अमरावतीत वातावरण तापलं… राणा विरुद्ध खोडके वाद पुन्हा उफाळला

Controversy Between Ravi Rana and Sanjay Khodke : महानगरपालिका निवडणूकीच्या आधीच अमरावतीत (Amravati) वातावरण तापल्याचं दिसत आहे. अमरावती जिल्ह्यात आमदार रवी राणा (Ravi Rana) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) नेते आमदार संजय खोडके (Sanjay Khodke) यांचं कट्टर राजकीय वैर आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या (Municipal Corporation election) अनुषंगाने अमरावतीत पुन्हा राणा खोडके वाद उफाळला असल्याचं दिसतंय.
आमदार रवी राणा यांनी काय म्हटलं?
खोडकेंनी एवढी गुर्मी अन् दादागिरी करू नये, असं वक्तव्य आमदार रवी राणा यांनी केलं आहे. लोकसभेमध्ये संजय खोडके यांनी महायुतीच्या विरोधात काम केलं. तर विधानसभा निवडणुकीसाठी खोडकेंना मदत करा, (Amravati Politics) म्हणून मला अजित पवारांचे 50 फोन आले. मी थोडं तरी त्यांचं (अजित पवार) ऐकलं नसतं. फेरफटका मारला असता तर खोडके यांना दहा हजार मतांनी पाडलं असतं. त्यामुळे त्यांनी एवढी गूर्मी करू नये, दादागिरी करू नये, असं रवी राणा यांनी म्हटलं आहे.
भारतविरोधी अफरीदीचं दुबईत जोरदार स्वागत; केरळच्या ‘त्या’ ग्रुपनं मागितली माफी, Video व्हायरल
तीन तीन वेळा त्यांना पटकणी दिल्यानंतर सुधारणा झाली नाही. जे लोक नेहमी अहंकारांमध्ये राहतात, त्यांचा अहंकार जनतेने चूर चूर केला आहे, असा हल्लाबोल रवी राणा यांनी संजय खोडके यांच्यावर केला आहे.
आमदार संजय खोडकेंचा पलटवार
आमदार रवी राणा यांच्या वक्तव्यावर आमदार संजय खडके यांनी देखील पलटवार केला. रवी राणा मला नेहमीच धमकी देतात. त्यांनी सांगितलं की निवडणुकीमध्ये तीन वेळा पाडलं. भरोशावर निवडून येत असतो, त्यावेळी जनतेने मला नाकारलं याची मलाही काही खंत नाही. रवी राणांमध्ये एवढी ताकद नाही की, ते मला पाडू शकतात.
मोठी बातमी! नागालँडमधील 7 आमदारांनी सोडली अजितदादांची साथ; सत्ताधारी एनडीपीत सामील
अजित पवार यांनी एकही फोन रवी राणा यांना केला नाही. उलट नवनीत राणांच्या प्रचाराला अमरावतीत अजित पवार आले होते, तेव्हा रवी राणा अजित पवारांना म्हटलं की, खोडकेंना स्टेजवर बोलवा, असा दावाच संजय खोडके यांनी केलाय. विधानसभा निवडणुकीत मला रवी राणा यांना सोबत घेऊन माझे मतं खराब करायचे नव्हते. रवी राणा जांच्यासोबत जातील, त्यांचे मतं खराब होत असता. तर रवी राणांचा पक्ष भाजपसोबत असेल तर आम्ही युती करणार नाही, असा हल्लाबोल संजय खोडके यांनी रवी राणा यांच्यावर केलाय.