Ravi Rana : पवारांनी उध्दव ठाकरेंची साथ सोडली तर… आमदार राणांचा ठाकरेंवर निशाणा

Ravi Rana : पवारांनी उध्दव ठाकरेंची साथ सोडली तर… आमदार राणांचा ठाकरेंवर निशाणा

Ravi Rana on Udhav Thackery : गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात महाविकास आघाडीमध्ये काही तरी बिनसलं असल्याच्या चर्चा सुरू आहेत. तर दुसरीकडे पवार कुटूंबीयांनी म्हणजे स्वतः शगद पवार आणि अजित पवार यांनी भाजपचं केलेलं समर्थन यामुळे देखील राज्याच्या राजकारणात पुन्हा सत्ताबदल होणार का? अशा देखील चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यादरम्यान ठाकरे गटावर भाजप आणि मित्र पक्षाकडून टीका केली जात आहे.

यावेळी अमरावतीचे अपक्ष आमदार रवी राणा यांनी देखील उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. राणा म्हणाले की, उद्धव ठाकरे व संजय राऊत यांनी शरद पवार यांच्याकडे जाऊन त्यांचे पाय पकडले. आम्हाला सोडून जाऊ नका. अशी विनवणी त्यांनी केली असं रवी राणा म्हणाले. तर आदित्य ठाकरे बालिश वक्तव्य करतात. एकनाथ शिंदे यांना डावलून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले उद्धव ठाकरे हा स्वार्थी माणूस आहे. उद्धव ठाकरे शरद पवार यांची भेट ही आम्हाला संकटातून सोडून जाऊ नका यासाठी झाली. अशी टीका आमदार रवी राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.

दरम्यान, उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याबाबत कोणत्याही नेत्यांना विचारात घेतलं नसल्याचं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी वक्तव्य केलं. त्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. तर दुसरीकडे पवारांनी वक्तव्य करताच उद्धव ठाकरे आणि संजय राऊत शरद पवारांच्या मुंबईतील सिल्वर ओक बंगल्यावर दाखल झाले. यावेळी त्यांनी शरद पवारांची भेट घेत चर्चा केली आहे.

‘अगं चंपाबाई धंगेकरला जीव थोडा लाव’.. धंगेकरांचं नवं गाणं तुफान व्हायरल..

दरम्यान, शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीची बातमी समोर येताच सत्ताधाऱ्यांकडून टीकेची तोफ उठली. त्यामध्ये अमरावतीचे अपक्ष आमदार रवी राणा यांनी देखील उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube