सामंतांचा यु टर्न! ‘माघार’ पोस्ट डिलीट, रत्नागिरीवरील दावाही कायम; आता राणे काय करणार?

सामंतांचा यु टर्न! ‘माघार’ पोस्ट डिलीट, रत्नागिरीवरील दावाही कायम; आता राणे काय करणार?

Ratnagiri Sindhudurg Lok Sabha Uday Samant : रत्नागिरी सिंधुदुर्ग निवडणूक रिंगणातून माघार (Ratnagiri Sindhudurg Lok Sabha) घेत असल्याची फेसबूक पोस्ट किरण सामंत यांनी (Kiran Samant) काल रात्री केली होती. मात्र, आज मोठा ट्विस्ट आला आहे. किरण सामंत यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधल्यानंतर त्यांनी ही पोस्ट डिलीट केली. रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघावरील शिवसेनेचा दावाही कायम आहे, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, उदय सामंत यांच्या वक्तव्यानंतर या मतदारसंघात पुन्हा मोठी ट्विस्ट आला आहे. आज दुपारी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत कुडाळमध्ये महायुतीची बैठक होणार आहेत.  या बैठकीत काय चर्चा होते याची उत्सुकता आता आहे.

रत्नागिरी-सिंधुदुर्गात किरण सामंतांची विकेट? राणेंनी दावा ठोकताच निवडणुकीतून घेतली माघार

उदय सामंत पुढे म्हणाले, किरण सामंत भावनिक आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अडचण होऊ नये म्हणून त्यांनी काल तशी पोस्ट केली होती. परंतु, आता माझे त्यांच्याबरोबर बोलणे झाले आहे. कार्यकर्ते आणि जनसामान्यांच्या भावना लक्षात घेत त्यांच्याबरोबर चर्चा केली आहे. या मतदारसंघात आमच्याकडून एकच इच्छुक उमेदवार आहे. त्यामुळे या मतदारसंघावरील आमचा दावा कायम आहे. किरण सामंत जास्त भावनिक आहेत. त्यांनी भावनेच्या भरात पोस्ट केली होती. पण आता ही पोस्ट त्यांनी मागे घेतली आहे, असे उदय सामंत म्हणाले.

रत्नागिरी सिंधुदुर्गावर शिवसेनेचा दावा आहे. मात्र अंतिम निर्णय एकनाथ शिंदेच घेतील. किरण सामंत यांनी आता पोस्ट मागे घेतली आहे. आमच्याकडून शिवसेनेकडून एकच उमेदवार आहे. काल रात्री किरण सामंत यांनी घेतलेला निर्णय भावनिक होती. शिंदे यांना त्रास होऊ नये म्हणून सर्व पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून माघार घेतली. उद्या या संदर्भात रत्नागिरीत बैठक होणार आहे. रत्नागिरीची जाग शिवसेनेलाच मिळाली पाहिजे अशी कार्यकर्त्यांची मागणी असल्याचे उदय सामंत म्हणाले.

दरम्यान, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासाठी हा मतदारसंघ भाजपला हवा होता. राणे यांना तशा सूचनाही पक्ष श्रेष्ठींनी दिल्या होत्या. यानंतर काल राणे यांनी पत्रकार परिषद घेत या मतदारसंघात भाजपचाच उमेदवार असेल असे स्पष्ट सांगितले होते. तर दुसरीकडे महायुतीच्या नेत्यांच्या बैठकीतही या मुद्द्यावर चर्चा झाली होती. रत्नागिरी मतदारसंघ घ्या पण ठाणे किंवा कल्याण मतदारसंघ द्या अशी अट टाकत भाजपने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कोंडी केली होती.

Akola Loksabha : शरद पवारांचं एक वाक्य अन् प्रकाश आंबेडकरांचा मार्ग मोकळा? 

 

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

वेब स्टोरीज