Akola Loksabha : शरद पवारांचं एक वाक्य अन् प्रकाश आंबेडकरांचा मार्ग मोकळा?

Akola Loksabha : शरद पवारांचं एक वाक्य अन् प्रकाश आंबेडकरांचा मार्ग मोकळा?

अमोल भिंगारदिवे

Akola Loksabha : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) मागील अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीत वंचित बहुजन आघाडीचा (VBA) समावेश होण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु होते. वंचितचा समावेश झाला खरा पण जागावाटपाच्या मुद्द्यावरुन युती फिस्कटली. अखेर प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) वंचितचे आठ उमदेवार जाहीर करुन स्वबळावरचा नारा दिला तर स्वत: आंबेडकरांनी अकोला लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अशातच आता काँग्रेसकडून अभय पाटील यांना उमेदवारी देऊन आंबेडकरांविरोधात उमेदवार दिलायं. याच घडामोडींवर आज शरद पवारांनी (Sharad Pawar) मोठं विधान करीत चर्चांना उधाण आणलं आहे. अकोल्यातील काँग्रेसच्या उमेदवारीबाबत काँग्रेससोबत चर्चा करणार असल्याचं पवारांनी स्पष्ट केलं आहे.

ठाकरेंचा एका दगडात दोन ‘पक्षांवर’ निशाणा; उन्मेष पाटील अन् करण पवारांचा भाजपला ‘राम-राम’

काँग्रेसने अकोला लोकसभा मतदारसंघासाठी एका मराठा समाजाच्या चेहऱ्याला उमेदवारी जाहीर केली. काँग्रेसकडून अकोला लोकसभा मतदारसंघासाठी अभय पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांच्यासमोर आता लोकसभा निवडणुकीसाठी कडवं आव्हान उभं राहिलं आहे. वंचितकडून नागपूर मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यात आला आहे. यासोबतच बारामतीतून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनाही वंचितकडून पाठिंबा देण्यात आला आहे. त्यामुळे आता शरद पवारांच्या मध्यस्थीने अकोला मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवाराने माघार घेतल्यास किंबहुना काँग्रेसने पाठिंबा जाहीर केल्यास प्रकाश आंबेडकरांचा लोकसभेत जाण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याचं बोललं जात आहे.

विक्रम काळे, बसवराज पाटील अन् परदेशी नक्कीच नाहीत… घरातूनच मिळणार निंबाळकरांना टफ फाईट

काय म्हणाले शरद पवार?
“अकोल्यातील काँग्रेसच्या उमेदवारीबाबत काँग्रेससोबत चर्चा करणार”, असं शरद पवारांनी म्हटलं आहे. “वेळ आहे, त्यावर काँग्रेसशी चर्चा करता येईल”. अकोल्यात प्रकाश आंबेडकर यांच्यासमोर काँग्रेसचा उमेदवार असणार आहे. काँग्रेसकडून अभय पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यावेळी शरद पवारांना वंचित बहुजन आघाडी बारामतीतही उमेदवार देण्याबाबतचा प्रश्न विचारला असता, “बारामतीत वंचित उमेदवार देणार असेल तर चांगली गोष्ट आहे, असं शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे.

काँग्रेसच्या उमेदवारामुळे पराभूत :
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपकडून अनुप धोत्रे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अनुप धोत्रे हे संजय धोत्रे यांचे पुत्र आहेत. मागील अनेक निवडणुकांमध्ये संजय धोत्रे यांनी विजय मिळवलेला आहे. 2019 सालच्या निवडणुकीत धोत्रेंना 5 .54 हजार मते मिळाली होती. तर आंबेडकरांना 2 लाख 78 हजार मते मिळाली. त्यावेळचे काँग्रेसचे उमेदवार हिदायतुल्ला पटेल यांना 2.54 लाख मते मिळाली.

दरम्यान, मागील निवडणुकीच्या निकालावरुन काँग्रेसच्या उमेदवारामुळे आंबेडकरांना पराभवाला सामोरं जावं लागल्याची परिस्थिती होती. या निवडणुकीतही काँग्रेसने उमेदवार दिला असल्याने अगदी तशीच परिस्थिती होईल, असंही बोललं जात आहे. मात्र, काँग्रेसकडून पाठिंबा मिळाल्यास अकोला मतदारसंघातून प्रकाश आंबेडकरांचा मार्ग मोकळा होणार असल्याची दाट शक्यता आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube