वंचित बहुजन आघाडी चिन्हापासूनच ‘वंचित’ ! राज्यभरात वेगवेगळ्या चिन्हावर मते मागावे लागणार

  • Written By: Published:
वंचित बहुजन आघाडी चिन्हापासूनच ‘वंचित’ ! राज्यभरात वेगवेगळ्या चिन्हावर मते मागावे लागणार

Prakash Ambedkar Vanchit Bahujan Aghadi No specific election Symbol: महाविकास आघाडीबरोबर सूत न जुळालेल्या वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Aghadi) स्वतंत्रपणे लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election) लढविण्याचा निर्णय घेतला आहे. वंचितने दोन उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या आहेत. आतापर्यंत वंचितने वीस ठिकाणी उमेदवार दिले आहेत. सर्वत्र वंचित उमेदवार देणार असले तरी या आघाडीला मात्र स्वतःचे एक निवडणूक चिन्ह नाही. या उमेदवारांना वेगवेगळ्या चिन्हांवर निवडणुकीच्या मैदानात उतरून मते मागायची आहेत. पहिल्या टप्प्यात विदर्भातील अनेक जागांवर 19 एप्रिलला रोजी मतदान होणार आहे. लोकसभेच्यापैकी चार मतदारसंघात वंचितला चिन्ह (Election Symbol) मिळाले आहेत. पण तीन वेगवेगळे चिन्ह मिळाले आहेत.


Mahadev Jankar : ‘माझं लग्न नाही, लफडं नाही, कुठंही काही नाही’

19 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्याचे मतदान होणार आहे. यासाठी निवडणूक उमेदवारी अर्ज दाखल व छाननी झाल्यानंतर आज चिन्हांचे वाटप करण्यात आले. वंचित बहुजन आघाडीला पक्ष म्हणून मान्यता मिळालेली नाही. त्यामुळे एक चिन्ह या आघाडीला मिळत नाही. वंचितने रामटेकमधून शंकर चहांदे यांना उमेदवारी दिली आहे. त्यांना गॅस सिलिंडर हे चिन्ह मिळाले आहेत. तर गडचिरोली चिमूर-मतदारसंघात हितेश मडावी यांना वंचितने रिंगणात उतरविले आहे. त्यांना निवडणूक निर्णय अधिकारी यांनी गॅस सिलेंडर हे चिन्ह दिले आहेत.

‘बच्चू कडूंचा भाजपशी थेट संबंध नाही’; बावनकुळेंनी थेटच सांगितलं

या दोन्ही मतदारसंघात वंचितला एकच चिन्ह मिळाले आहेत. पण भंडारा व चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात वेगळे चिन्ह मिळाले आहेत. भंडारा लोकसभा मतदारसंघात मोळी घेतलेला शेतकरी आणि चंद्रपूर मतदारसंघात राजेश बेले यांना रोड रोलर चिन्हावर मते मिळवायची आहेत.

प्रकाश आंबेडकरांना धक्का

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी निवडणुकीपूर्वी निवडणूक आयुक्तांची भेट घेऊन एकच निवडणूक चिन्ह देण्याची मागणी केली होती. लोकसभेसाठी गॅस सिलिंडर, शिट्टी, रोड रोलर या पैकी एक निवडणूक चिन्हाची माणी आंबेडकरांची होती. परंतु वंचित बहुजन आघाडीला एकच निवडणूक चिन्ह मिळाले नाही. त्यामुळे वंचितला राज्यातील सर्वच लोकसभा मतदारसंघात वेगवेगळ्या चिन्हावर लढावे लागणार आहे. त्यामुळे प्रचार करण्यासाठी उमेदवारांना अडचणी येणार आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube