महाराष्ट्र भटकत्या आत्म्याचा शिकार, कुटुंबातही तसेच केले; नरेंद्र मोदींचा शरद पवारांवर निशाणा

  • Written By: Published:
महाराष्ट्र भटकत्या आत्म्याचा शिकार, कुटुंबातही तसेच केले; नरेंद्र मोदींचा शरद पवारांवर निशाणा

Narendra Modi Pune Speech : लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची पुण्यात आज सभा झाली. या सभेत नरेंद्र मोदी यांनी शरद पवार, राहुल गांधींवर निशाणा साधलाय. काही भटकत्या आत्मा असतात. त्यांच्या इच्छा पूर्ण झाल्या नाही, स्वप्न अपूर्ण राहिल्या, तर त्या आत्मा भटकत राहतात. ते दुसऱ्यांचेही बिघडवित असतात. आमचा महाराष्ट्र अशा एका भटकत्या आत्म्याचा शिकार झालाय, अशा शब्दात नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांवर (Sharad Pawar) नाव न घेता टीका केली आहे.

त्यांना कशाला घेता, आम्हीच भाजपसोबत येतो, ठाकरेंचा दिल्लीत फोन; CM शिंदेचा गौप्यस्फोट

नरेंद्र मोदी म्हणाले, भटकत्या आत्मा स्वतःचे काही नाही झाले तर दुसराचे बिघडविण्याची काम करतात. आमचा महाराष्ट्र अशाच भटकत्या आत्माचा शिकार झाला आहे. 45 वर्षापूर्वीं येथील मोठ्या नेत्यांनी आपल्या महत्वाकाक्षांसाठी या खेळाची सुरुवात केली आहे. तेव्हापासून महाराष्ट्र अस्थिर झाला आहे. अनेक मुख्यमंत्री कार्यकाळ पूर्ण करू शकले नाही. हे विरोधकांना नाही तर ही आत्मा आपल्या पार्टीत तसेच करत आहे. ही आत्मा कुटुंबातही असेच करतात, असा आरोपही मोदी यांनी केला आहे.

उज्ज्वल निकम भाजपचे उमेदवार, प्रकाश आंबेडकर म्हणाले, ‘माणूस म्हणून…’

1995 भाजप-शिवसेना सरकार आली होती. तरीही या आत्माने सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केला. 2019 ला जनादेशाचा अपमान या आत्माने केला आहे. महाराष्ट्राला अस्थिर करणारा नेता देशाला अस्थिर करण्याचा खेळ करत आहे. महाराष्ट्रातील भटकती आत्मा थांबवून देशात स्थिर मजबूत सरकार आणण्याचे आहे, असे मोदी म्हणाले.

काँग्रेसच्या युवराजला विचारा गरिबी कशी हटविले जाते. ते म्हणतात, खटाखट आहे. युवराजला विचारा विकास कसा होतो. ते म्हणतात खटाखट, टकाटक आहे. दुनिया कशी आहे ते म्हणतात टकाटक, अशा शब्दात मोदी यांनी राहुल गांधीवर निशाणा साधलाय.

महागाई आणि भ्रष्टाचाराचा डबल टॅक्स घेतला

काँग्रेस सरकारने तुमच्याकडून महागाई आणि भ्रष्टाचारचा डबल टॅक्स घेतला. आम्ही सत्तेत आल्यानंतर महागाईवर नियंत्रण आणले आणि भ्रष्टाचारवर मोठी कारवाई केली. आम्ही आयकरची मर्यादा वाढवली. जन औषधी केंद्रामुळे गरिबांची मदत होत आहे. तर आता देशात ७० वर्षापेक्षा जास्त वयोगटातील लोकांना मोफत उपचार मिळणार ही मोदींची गॅरंटी आहे असं देखील मोदी म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज