उज्ज्वल निकम भाजपचे उमेदवार, प्रकाश आंबेडकर म्हणाले, ‘माणूस म्हणून…’
Prakash Ambedkar On Ujjwal Nikam : उत्तर मध्य मुंबईतून काँग्रेसने वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांना उमेदवारी दिली. तर त्यांच्या विरोधात भाजपने पूनम महाजन (Poonam Mahajan) यांचा पत्ता कट करत ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवले आहे. निकम यांना उमेदवारी मिळाल्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार टीका करायला सुरूवात केली. आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी निकम यांच्या उमेदवारीवर भाष्य केलं.
बॅक-टू-बॅक 34 सिनेमे फ्लॉप; अखेर अक्षयच्या ‘वेलकम टू जंगल’मध्ये अभिनेता बनणार सुपरस्टार
प्रकाश आंबेडकरांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. निकम यांच्या उमेदवारीवर बोलतांना आंबेडकर म्हणाले, उज्ज्वल निकम यांना उत्तर-मध्य मुंबईतून उमेदवारी देण्यात आली आहे. माणूस म्हणून, व्यक्ती म्हणून त्यांच्यावर काही आक्षेप घेता येणार नाही. लोकांना त्यांच्या माध्यमातून एक चॉईस आहे. निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराला सुरूवात झाली आहे. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात भाजपला एक लाख -दीड लाख मतदान मिळालं होतं. तसं यंदा दिसत नाही. भाजपकडे नवीन तरुण नाहीत, असे दिसते. मतदानाची टक्केवारी घटली आहे. घटलेली मते भाजपची आहेत. याचे परिणाम भाजपला भोगावे लागतील, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली.
युवराजाला आपसूक सत्ता मिळत नाही म्हणून निवडणूक आयोग हुकूमशाही ठरत नाही, मोदींचा घणाघात
मोदींच्या सभांचा फायदा होणार नाही
पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात आम्हाला जास्त जागा मिळतील, असा दावा भाजप करताना दिसत नाही. नरेंद्र मोदींच्या सभांचा फायदा होणार नाही. याउलट मोदी जितक्या जास्त सभा घेतील, तितका फायदा आपल्याला होईल, असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला.
मोदींनी चारशे पारचा नारा दिला. त्यांना संविधान बदलायचं त्यामुळं त्यांना चारशे जागा पाहिजेच. टीका होऊ लागल्यावर मोदीजी सांगतात की, बाबासाहेब आले तरी संविधान बदलू शकत नाही. पण, हा त्यांचा दिखावा आहे, अशी टीका आंबेडकरांनी केली.
सुळे आणि पाटलांनी विनंती केल्यानं उमेदवार दिला नाही…
शरद पवार हे बारामतीत अडकले आहेत. त्यांच्याविषयी मी आता बोलणार नाही. पण, सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांनी विनंती केल्यामुळे आपण बारामती लोकसभा मतदार संघात वंचितचा उमेदवार दिला नसल्याचा दावा आंबेडकरांनी केला.