Vidhansabha Election : CM शिंदेंचा दौरा रद्द तर, अजितदादा-फडणवीस अमित शाहांच्या भेटीला
Vidhansabha Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा दिल्ली दौरा अचानक रद्द झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. महायुतीच्या (Mahayuti) प्रलंबित जागावाटपाचा निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला जाणार होते. ते गोव्याहून दिल्लीला जाणार असल्याची माहिती होती. मात्र शिंदे यांचा दौरा अचानक रद्द झाल्याची माहिती सुत्रांनी दिली. शिंदे यांचा दिल्ली दौरा रद्द करण्यामागचे कारण अद्याप समोर आलेले नाही.
CM शिंदेंना बालेकिल्ल्यात आव्हान देणारे केदार दिघे आहे तरी कोण, जाणून घ्या सर्वकाही …
160 हून अधिक जागांवर निवडणूक लढवण्याचा भाजपचा विचार असून शिंदे गटाला 75-80 जागा आणि अजित पवार गटाला 45-50 जागा देण्याचा भाजपचा प्रस्ताव आहे. हा प्रस्ताव शिंदे आणि अजित पवारांना मान्य नसल्यानं काही जागांवर अद्यापही महायुतीत तिढा आहे. हाच तिढा सोडवण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीला गेले आहेत.
अजितदादा गटाकडून सुनील शेळकेंना उमेदवारी, नाराज बापू भेगडे अपक्ष लढणार, भाजपचाही पाठिंबा?
दिल्लीत महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. जागावाटपाबाबत चर्चा करण्यासाठी देवेंद्र फडणवीस आज दुपारी दिल्लीला रवाना झाले. त्यानंतर सायंकाळी उशिरा अजित पवार दिल्लीला रवाना झाले. ते आज दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा करणार आहेत. या बैठकीत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटपाबाबत तिन्ही नेते चर्चा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 87 जागांवर निवडणूक लढवण्याचा विचार करत आहेत. मात्र भाजप शिवसेनेसाठी एवढ्या जागा सोडण्यास तयार नाही. या जागावाटपाचा तिढा सोवडण्यासाठीच एकनाथ शिंदे रात्री दिल्लीला जाणार असल्याची माहिती होती. मात्र शिंदे यांचा दौरा ऐनवेळी रद्द झाला.
कोणत्या पक्षाने किती उमेदवारी जाहीर केले?
भाजपने आतापर्यंत 99 उमेदवारांची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्ष शिवसेनेकडून 45 तर अजित पवार यांच्या गटाकडून 38 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. म्हणजेच महायुतीने आतापर्यंत एकूण 182 जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. अजूनही 105 जागांचा तिढा कायम आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदे हे उद्या आपलाउमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला कधी ठरतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.