CM शिंदेंना बालेकिल्ल्यात आव्हान देणारे केदार दिघे आहे तरी कोण, जाणून घ्या सर्वकाही …
Who Is Kedar Dighe : राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. सध्या महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीकडून (MVA) उमेदवारांची घोषणा करण्यात येत आहे. 22 ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आपल्या 45 उमेदवारांची घोषणा करताना ‘हिंदुहृदयसम्राट वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि वंदनीय धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या आशीर्वादाने महाराष्ट्र विधानसभा निवडणूक – 2024 साठी शिवसेना पक्षाच्या अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येत आहे. अशी पोस्ट X वर करत त्यांनी आपल्या 45 उमेदवारांची घोषणा केली होती.
तर आज (23 ऑक्टोबर) रोजी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी देखील आपल्या 65 उमेदवारांची घोषणा केली आहे. ठाकरेंकडून मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघात देखील तगडा उमेदवार दिल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.
ठाकरेंनी कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघात मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) यांचे पुतणे केदार दिघे (Kedar Dighe) यांना उमेदवारी दिली आहे. आता या मतदारसंघात मुख्यमंत्री शिंदे आणि ठाकरेंचे उमेदवार केदार दिघे यांच्यात मुख्य लढत होणार आहे. त्यामुळे आता या मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे धर्मवीर आनंद दिघे यांना राजकीय गुरु मानत असल्याने त्यांच्या विरोधात ठाकरेंनी थेट धर्मवीर आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांना उमेदवारी दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या प्रत्येक भाषणाची सुरुवात धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावाने करत असतात त्यामुळे कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघात शिंदे विरुद्ध दिघेमध्ये होणाऱ्या सामन्यात कोण बाजी मारणार याचा उत्तर 23 नोव्हेंबर रोजी मिळणार आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची अधिकृत उमेदवारांची पहिली यादी. pic.twitter.com/QAJ01ce7ds
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) October 23, 2024
केदार दिघे धर्मवीर आनंद दिघे यांचे पुतणे आहे. सध्या ते शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे ठाणे जिल्हाप्रमुख आहेत. त्यांनी 2006 मध्ये राजकारणात प्रवेश केला होता. मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर ठाणे जिल्ह्यात उद्धव ठाकरेंकडून केदार दिघे यांच्यावर मोठी जबाबदारी सोपविण्यात आली होती.
Turkey Attack: मोठी बातमी! तुर्कीच्या एरोस्पेस आणि संरक्षण कंपनी TUSAS वर दहशतवादी हल्ला
तर दुसरीकडे या मतदारसंघातून मुख्यंमत्री एकनाथ शिंदे 2009 पासून विजयी होत आहे. 2019 च्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे संजय घाडीगावकर यांचा 89,000 मतांनी पराभव केला. त्यामुळे यावेळी त्यांना केदार दिघे आव्हान देणार का? याबाबत राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.