अजितदादा गटाकडून सुनील शेळकेंना उमेदवारी, नाराज बापू भेगडे अपक्ष लढणार, भाजपचाही पाठिंबा?
Mawal Politics : मावळचे विद्यमान आमदार सुनील शेळकेंना (Sunil Shelke) अजित पवार (Ajit Pawar) गटाने उमेदवारी दिल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापू भेगडेंनी (Bapu Bhegade) अपक्ष निवडणुक लढण्य़ाचा निर्णय घेतला. हा अजित पवार गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
शिवाजीराव कर्डिलेंच्या खेळीने राहुरीत निकाल बदलणार? मोठ्या नेत्याच्या हाती ‘कमळ’
बापू भेगडेंनी आज पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीला पक्षाचे माजी तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, बाबुराव वायकर, सुभाष जाधव, किशोर भेगडे, सुभाष राक्षे, सचिन घोटकुळे, संतोष भेगडे, शिवाजी आसवले, अरुण माने, सुनील दाभाडे, सुनील भोंगाडे, कैलास गायकवाड आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी भेगडे म्हणाले, मावळ तालुक्यातील जनतेच्या आग्रहास्तव आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या बळावर मी ही विधानसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढण्याचा निर्णय घेतला आहे. मावळ तालुका हा भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणी मानणारा चालणारा तालुका आहे.
ते म्हणाले, 1995 ते 2019 या काळात या तालुक्यात भाजपचे आमदार होते. राज्यात आमचा पक्ष सत्तेत परंतु, तालुक्यात विरोधात असं असल्यामुळं अनेकदा आमच्या कार्यकर्त्यांची कामे होत नव्हती. कार्यकर्त्यांचं मानसिक खच्चीकरण झालेलं होतं. अशावेळी हा पक्ष जिवंत ठेवण्याचं काम माझ्यासह बबनराव भेगडे असतील, मदन बाफना, कृष्णराव भेगडे, बाळासाहेब नेवाळे यांच्या नेतृत्वाखाली झाले आहे.
Turkey Attack: मोठी बातमी! तुर्कीच्या एरोस्पेस आणि संरक्षण कंपनी TUSAS वर दहशतवादी हल्ला
ते म्हणाले, मी 2009 मध्ये पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. पण दुर्दैवाने मी मला अपयश आले. 2019 मध्ये मला उमेदवारी देण्याची विनंती मी पक्षाला केली होती आणि त्यावेळी मी निवडून येण्याची दाट शक्यता होती, तेव्हा पक्ष नेतृत्वाने परस्पर बाहेरच्या व्यक्तीला उमेदवारी देण्याचा निर्णय घेतल्याची खंत बापू भेगडेंनी व्यक्त केली.
पुढं ते म्हणाले, पक्षाचा आदेश माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी शिरसावंद्य मानून मागील वेळी सुनील शेळकेंचे काम केलं. खरंतर सुनील शेळके यांनी पहिल्याच बैठकीत कार्यकर्त्यांना आश्वासन दिले होते की, मला फक्त एक संधी हवी आहे, पुढच्या वेळी मी बापूसाहेब भेगडे यांना आमदार करेन. मात्र, आज ते शब्द फिरवत पुन्हा उमेदवारीच्या स्पर्धेत आले आणि उमेदवारी मिळवली. यामुळे राष्ट्रवादीच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची घोर निराशा झाल्याचं बापू भेगडे म्हणाले.
भाजप पदाधिकाऱ्यांचीही बापू भेगडेंना पाठिंबा…
तर भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडेंसह सर्व माळच्या पदाधिकाऱ्यांनीही राजीनामे दिले. त्यांनी बापू भेगडे यांच्या बंडाला आपला पाठिंबा जाहीर केला. निवडणुका आम्ही जिंकणारच आहोत. विधानसभा निवडणुकीत शेळकेंचा पराभव करणे हेच आमचं लक्ष असल्याचे बाळा भेगडे म्हणाले.