मावळचे राजकारण तापले ! सुनील शेळकेंकडून भाजपचा उमेदवार जाहीर; बाळा भेगडेंचा चिडून सल्ला…

  • Written By: Published:
मावळचे राजकारण तापले ! सुनील शेळकेंकडून भाजपचा उमेदवार जाहीर; बाळा भेगडेंचा चिडून सल्ला…

Sunil Shelke vs Bala Bhegade: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी काही दिवसांत सुरू होणार आहे. त्यादृष्टीने उमेदवारी तयारी सुरू केलीय. त्यावरून पुणे जिल्ह्यातील मावळमध्ये राजकारण तापले आहे. राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) यांनी थेट मावळच्या (Maval)नगराध्यक्षपदासाठी भाजपचा उमेदवार जाहीर केलाय. त्यावरून स्थानिक भाजपमध्ये खळबळ उडाली. भाजप पदाधिकाऱ्यांनी थेट माध्यमांसमोर येऊन आमदार सुनील शेळके यांना सुनावले आहे. तर सुनील शेळके यांनी प्रत्युत्तर देत भाजपच्या स्थानिक नेत्यांना डिवचले आहे.

आमदार सुनील शेळके हे मावळचे भाजपचे माजी शहराध्यक्ष संतोष दाभाडे यांच्या वाढदिवसाला गेले होते. त्यावेळी महायुती म्हणून संतोष दाभाडे हे नगराध्यक्षपदाचे उमेदवार असतील तर आमच्या त्यांना पाठिंबा राहील, असे शेळके यांनी जाहीर करून टाकले. त्यावरून माजी मंत्री बाळा भेगडे, मावळचे माजी तालुकाध्यक्ष रवी भेगडे यांनी आमदार शेळके यांना प्रत्युत्तर दिले आहे.


दीड हजार विद्यार्थ्यांना मिळाला रोजगार; पीसीईटी सेंट्रल प्लेसमेंट सेलचा पुढाकार


आमदारांनी दुसऱ्याला सल्ला देऊ नये; बाळा भेगडे

माजी मंत्री बाळा भेगडे (Bala Bhegade) हे पत्रकार परिषदेत म्हणाले, भाजप म्हणून मावळबाबत आमची लोणावळा, देहू रोड बैठक झाली आहे. प्रथम जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहे. त्यानंतर नगरपालिकेची निवडणूक आहे. आमचा उमेदवार कोण असेल ते भाजपची कोर कमिटी ठरवेल. आमदाराला दुसऱ्याला सल्ला देण्याची गरज नाही. संतोष दाभाडे यांना आमचा विरोध नाही. परंतु उमेदवार पक्ष ठरवेल. आमदारांनी भाजपचा उमेदवार जाहीर करणे म्हणून राष्ट्रवादीकडे नगराध्यक्षपदाचा उमेदवार नसावा, असा टोला बाळा भेगडे यांनी लगावला.

…तोपर्यंत सरकार व पालकमंत्री झोपा काढत होते का? हिंजवडी आयटी कंपन्यांवरून सपकाळांचा टोला

भाजपची जबाबदारी आमदारांनी घेऊ नये: रविंद्र भेगडे

भाजपाचे मावळचे माजी तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे यांनीही आमदार सुनील शेळकेंवर टीका केलीय. महायुती म्हणून संतोष दाभाडे यांना पाठिंबा देणे हे सांगणे स्वागर्ताह आहे. पण भाजपचा उमेदवार ठरविण्याचा अधिकार आमदारांना नाही. तुम्ही तुमच्या पार्टीचा काम सक्षमपणे करा. महायुतीचा विचार करताना अटी व शर्थीवर महायुती होणार नाही. भाजपचे जबाबदारी आमदारांनी घेऊन नये, भाजप आपले काम करेल, असे रविंद्र भेगडे म्हणाले.


संतोष दाभाडेंना कुणाचा विरोध

यावर सुनील शेळके म्हणाले, संतोष दाभाडे यांचे नाव थेट जाहीर केले नाही. आमचा महायुतीचा उमेदवार म्हणून जर संतोष दाभाडे यांचे नाव जाहीर केले.तर आमचा पाठिंबा राहिल, असे जाहीर केले. भाजपचा नाही तर महायुतीचा उमेदवार म्हणून पाठिंबा आहे. महायुतीचा उमेदवार कुणाला खूपत असेल किंवा संतोष दाभाडेंच्या नावाला कुणाचा विरोध असेल तर त्यांनी ते उघडपणे सांगावे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube