52 खासदारांची हॅट्ट्रीक, 2 दिग्गज आठव्यांदा घेणार शपथ; लोकसभेत नव्या-जुन्यांची मांदियाळी

52 खासदारांची हॅट्ट्रीक, 2 दिग्गज आठव्यांदा घेणार शपथ; लोकसभेत नव्या-जुन्यांची मांदियाळी

Parliament Session : अठराव्या लोकसभेचे सत्र 24 जून पासून सुरू (Parliament Session) होणार आहे. या अधिवेशनात खासदारांना शपथ देण्यात येणार आहे. या निवडणुकीत अनेक नवीन चेहरे पहिल्यांदाच संसदेत पोहोचले आहेत. तर अनेक जुनेजाणते आणि अनुभवी खासदार आहेत ज्यांच्यावर जनतेने पुन्हा एकदा विश्वास टाकला आहे. आता हे सर्व खासदार संसदेत जमा होणार (Elections  2024) आहेत. यामध्ये 52 खासदार असे आहेत ज्यांनी सलग तीन वेळा निवडून येत विजयाची हॅट्ट्रिक केली आहे. तर दोन दिग्गज सलग आठव्यांदा खासदारकीची शपथ घेणार आहेत. सात खासदार असेही आहेत जे सातव्या वेळेस शपथ घेणार आहेत.

तिसऱ्या वेळेस मंत्रिपदाची संधी मिळालेले मध्य प्रदेशातील खासदार वीरेंद्र कुमार यांची राजकीय कारकीर्द खास आहे. वीरेंद्र कुमार सलग आठ वेळेस निवडून आले आहेत. अकराव्या लोकसभेपासून सुरू झालेला हा विजयाचा सिलसिला अजूनही संपलेला नाही. केरळमधील काँग्रेसचे (Congress Party) खासदार के. सुरेश देखील आठव्या वेळेस निवडून आले आहेत. तर सलग तिसऱ्यांदा निवडून विजयाची हॅटट्रिक साधणारे 52 खासदार संसदेत शपथ घेणार आहेत.

Loksabha Election Result : भाजप न हारले न जिंकले; 400 पारची गणितं कुठे आणि कशी चुकली?

के. सुरेश यांनी मागील निवडणुकीत विजयी होत सलग दुसरी हॅट्ट्रिक केली होती. अशाच प्रकारे सात खासदार असे आहेत जे सलग सातव्या वेळेस खासदारकीची शपथ घेणार आहेत. यामध्ये भाजप खासदार मंसुख भाई धनजी भाई वसावा (गुजरात), रमेश चंदप्पा (कर्नाटक), आणि ओडिशातील भर्तुहरी महताब सलग सातव्या वेळेस निवडून आले आहेत. सलग सहाव्या वेळेस शपथ घेणारे दहा खासदार आहेत. यामध्ये गोव्यातून भाजपच्या तिकिटावर श्रीपाद यशोनाईक यांनी सलग सहाव्यांदा विजय मिळवला आहे.

पाचव्या वेळेस खासदार होणार दहा सदस्य

सलग पाचव्या वेळेस खासदार होणारे दहा सदस्य आहेत. तर सलग पाच वेळेस विजयी होणाऱ्या खासदारांत काँग्रेस नेते राहुल गांधी, एमआयएमचे असदुद्दीन ओवैसी, माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, जीपी चंदनगौडा, दुष्यंत सिंह आणि गणेश सिंह यांचा समावेश आहे. यावेळेस 35 खासदार चौथ्यांदा संसदेचे सदस्य होणार आहेत. तर 73 खासदार तिसऱ्यांदा शपथ घेणार आहेत. यामध्ये हॅट्ट्रिक साधणारे 52 खासदार आहेत. विशेष म्हणजे यामध्ये सात महिला खासदार आहेत.

Elections Results : आम आदमीचा ‘चक्रव्यूह’ भेदत भाजपनं दिल्ली जिंकली; ‘हा’ प्लॅन ठरला किंगमेकर

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज