आजोबा नेपाळचे PM, मुलगा केंद्रात मंत्री; मध्य प्रदेशच्या माधवीराजे सिंधिया कालवश

आजोबा नेपाळचे PM, मुलगा केंद्रात मंत्री; मध्य प्रदेशच्या माधवीराजे सिंधिया कालवश

Madhavi Raje Scindia Death : मध्य प्रदेशच्या राजकारणातील दिग्गज राजकारणी आणि केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या आई माधवी राजे सिंधिया आता (Madhavi Raje Scindia) या जगात नाहीत. आज दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी अंतिम श्वास घेतला. येथे त्यांच्यावर मागील दोन महिन्यांपासून उपचार सुरू होते. तसेच त्यांना बऱ्याच दिवसांपासून व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या कार्यालयाकडून प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात माधवी राजे सिंधिया यांच्या निधनाची माहिती देण्यात आली.

माधवी राजे सिंधिया यांचे आजोबा नेपाळचे माजी पंतप्रधान होते. तर त्यांचे पती माधवराव सिंधिया काँग्रेसजे मातब्बर नेते म्हणून ओळखले जात होते. ग्वाल्हेरच्या राजमाता या नावाने ओळखल्या जाणाऱ्या विजया राजे सिंधिया यांच्या त्या स्नुषा होत्या. माधवी राजे या नेपाळच्या राजघराण्यातील होत्या. त्यांचे आजोबा शमशेर जंग बहादूर नेपाळचे पंतप्रधान राहिले आहेत.

Madhya Pradesh : नोकरी गेली अन् तिकीटही नाही! चौहान सरकारने केला उपजिल्हाधिकाऱ्याचा गेम

माधवी राजे यांचा विवाह १९६६ मध्ये माधवराव सिंधिया यांच्याबरोबर झाला होता. माधवराव रेल्वेनेच वऱ्हाड घेऊन गेले होते अशी त्यांच्या लग्नाची आठवण आजही सांगितली जाते. माधवी राजे सिंधिया यांचे पती माधवराव सिंधिया देशातील मातब्बर नेत्यांत ओळखले जात होते. हेलिकॉप्टर दुर्घटनेत त्यांचं निधन झालं होतं. माधवीराजे आणि माधवराव सिंधिया यांना दोन मुलं आहेत. माधवी राजे सामाजिक कार्यात जास्त सक्रिय होत्या. जवळपास २४ धर्मार्थ ट्रस्टच्या त्या अध्यक्षा होत्या. या ट्रस्टच्या माध्यमातून शिक्षण, आरोग्य यांसारख्या क्षेत्रात योगदान दिले जाते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज