‘यूपी’, ‘तेलंगणा’नंतर MP! लोकसभेच्या रिंगणात ‘बसपा’; मध्य प्रदेशात उमेदवार देणार

‘यूपी’, ‘तेलंगणा’नंतर MP! लोकसभेच्या रिंगणात ‘बसपा’; मध्य प्रदेशात उमेदवार देणार

BSP to Contest Lok Sabha Election in Madhya Pradesh : उत्तर प्रदेश आणि तेलंगाणानंतर मध्य प्रदेशात लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election) लढण्याची घोषणा बसपाने केली आहे. या निवडणुकीत बसपा (BSP) मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) सर्व 29 लोकसभा मतदारसंघात उमेदवार देणार आहे. मध्य प्रदेशात बहुजन समाज पार्टीने एन्ट्री घेतल्याने येथील निवडणूक तिरंगी होण्याची शक्यता आहे. समाजवादी पार्टी (Samajwadi Party) आणि काँग्रेस (Congress) यांच्यात आघाडी झाल्यानंतर सपाने खजुराहो मतदारसंघात निवडणूक लढण्याचा प्रस्ताव दिला होता. हा प्रस्ताव काँग्रेसने मान्य केला होता. त्यानंतर आता बसपा सुद्धा मध्य प्रदेशात नशीब आजमावण्याच्या प्रयत्नात आहे.

मध्य प्रदेशातील सर्व मतदारसंघात उमेदवार देण्यासंदर्भात पक्षप्रमुख मायावती (Mayawati) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा करत आहेत. मध्य प्रदेशातील इच्छुक उमेदवारांची यादी मागवण्यात आली आहे. या उमेदवारांच्या नावावर चर्चा झाल्यानंतर साधारण एका आठवड्याच्या आत उमेदवारांच्या नावांची घोषणा होऊ शकते. तसं पाहिलं तर मध्य प्रदेशात काँग्रेस आणि भाजप (BJP) यांच्यातच लढत होत असते. परंतु, आता बसपाने एन्ट्री घेतल्याने दोन्ही पक्षांच्या मतांत विभाजन होण्याची शक्यता वाढली आहे.

आगामी लोकसभेसाठी केसीआर-मायावती घेणार एकमेकांची मदत; बसपा-बीआरएस आघाडीची घोषणा

तेलंगणात बीआरएस-बसपा आघाडी 

बहुजन समाज पार्टीने लोकसभा निवडणुकीसाठी तेलंगाणात आघाडीची घोषणा केली आहे. माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीबरोबर आघाडी करण्यात आली आहे. दोन्ही पक्ष एकत्रित उमेदवार देणार आहेत. उत्तर प्रदेशात बसपा सर्व मतदारसंघात उमेदवार देण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशात अनेक मतदारसंघात बसपा मजबूत स्थितीत आहे. अशा परिस्थितीत बसपा प्रमुख राजकीय पक्षांना धक्का देऊ शकते.

दरम्यान, भारत राष्ट्र समिती-बहुजन समाज पक्षाच्या युतीची घोषणा झाल्यानंतर आता भारत राष्ट्र समिती तेलंगणातील काही जागा बहुजन समाज पक्षाला सोडण्याची तर भारत राष्ट्र समिती उत्तर प्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षला काही जागा सोडण्याची शक्यता आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज