“मी अमोलला सांगितलं, सरळ कोर्टात जा..” स्वपक्षीय खासदाराविरोधात पित्याचा पुत्राला सल्ला

“मी अमोलला सांगितलं, सरळ कोर्टात जा..” स्वपक्षीय खासदाराविरोधात पित्याचा पुत्राला सल्ला

Mumbai News : उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातील वाद विकोपाला (Mumbai News) गेला आहे. या मतदारसंघात शिंदे गटाचे रवींद्र वायकर फक्त (Ravindra Waykar) 48 मतानी निवडून आले होते. मात्र या निवडीवर आक्षेप घेत ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे धाव घेतली होती. या वादात आता आणखी एक ट्विस्ट आला आहे. शिंदे गटाचे नेते आणि माजी खासदार गजानन किर्तीकर यांनीच अप्रत्यक्षपणे रवींद्र वायकरांच्या विरोधात पावलं उचलण्याचा सल्ला पुत्र अमोल किर्तीकर (Amol Kirtikar) यांना दिल्याची चर्चा आहे. त्यामुळे शिंदे गटातील (Election Result) अंतर्गत कलह पुन्हा एकदा समोर आला आहे.

याबाबत गजानन किर्तीकर यांना (Gajanan Kirtikar) विचारले असता ते म्हणाले, मी अमोलला सांगितलंय, उबाठा गटाच्या पदाधिकाऱ्यांनाही सांगितलं आहे. मतमोजण आणि रिटर्निंग ऑफिसरबाबत तुमच्या मनात ज्या काही शंका आहेत त्यांची चर्चा वृत्तपत्र आणि प्रसारमाध्यमांतून करण्यात काहीच अर्थ नाही. यासाठी तुम्ही सरळ न्यायालयात जा, तेथे जो काही निर्णय होईल तो स्वीकारा.

‘शहांचा राज्यपालपदाचा शब्द, दरेकरांनी विनाकारण बोलू नये’ किर्तीकरांसाठी अडसूळ मैदानात

ठाकरे गटाकडून जो काही आरोप केला जात आहे त्याच्या जास्त खोलात मी गेलेलो नाही. कारण तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे. माझा मुलगा आहे म्हणून मी कोणतेही मतप्रदर्शन करणार नाही. मी माझं स्वतःचं मत मांडू शकत नाही. यासाठी त्यांनी सरळ न्यायालयात गेलं पाहिजे. त्यांचे जे काही आक्षेप आहेत ते त्यांनी न्यायालयात सादर करावेत. यानंतर न्यायालय जो निर्णय देईल तो त्यांनी मान्य केला पाहिजे, असे किर्तीकर म्हणाले.

वायकरांना खासदारकीची शपथ देऊ नका

रवींद्र वायकर यांचे निवडणूक जिंकणे वादग्रस्त व शंकास्पद आहे, येथे पारदर्शक व कायदेशीर वातावरणात मतमोजणी झालेली नाही त्यामुळे त्यांना लोकसभेत खासदार म्हणून शपथ देऊ नये अशी मागणी उत्तर पश्चिम मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढलेले हिंदू समाज पार्टीचे एक उमेदवार भरत शाह यांनी त्यांचे वकील ॲडव्होकेट असीम सरोदे यांच्यामार्फत लोकसभा सरचिटणीस उत्पलकुमार सिंग यांना नोटीस पाठवून केली आहे. लोकसभा सरचिटणीस उत्पलसिंग यांना इमेल द्वारे सुद्धा हे नोटिसीपत्र पाठविल्याचे ॲड.असीम सरोदे यांनी सांगितले.

 तर मी 1 मतांनी मागे कसं काय? रवींद्र वायकरांचा विरोधकांना प्रतिसवाल

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज