Elections Results : आम आदमीचा ‘चक्रव्यूह’ भेदत भाजपनं दिल्ली जिंकली; ‘हा’ प्लॅन ठरला किंगमेकर

Elections Results : आम आदमीचा ‘चक्रव्यूह’ भेदत भाजपनं दिल्ली जिंकली; ‘हा’ प्लॅन ठरला किंगमेकर

Lok Sabha Elections Results : भारतीय जनता पार्टीने पुन्हा एकदा राजधानी दिल्लीतील सर्व सात जागांवर विजय मिळवला आहे. निवडणुकीत बऱ्याच वेळा असं घडलं की आम् आदमी पार्टीच्या नेत्यांनी भाजपची कोंडी केली. भाजप नेते सुद्धा गोंधळात पडले होते. या राजकारणाला काय उत्तर द्यावं हे त्यांनाही सुचत नव्हतं. अरविंद केजरीवाल यांना झालेली अटक यांमुळे पक्षाला सहानुभूती निर्माण झाल्याची चर्चा होती. मात्र या स्क्रिप्ट मध्ये काहीच दम नसल्याचं निवडणुकीच्या निकालावरून स्पष्ट झालं आहे.

भाजपने मागील वेळे प्रमाणे यंदाही दिल्लीत सर्व सात जागा जिंकून आपला जोरदार दणका दिला आहे. या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांची जादू चालली. दोघांनी घेतलेल्या सभांचा परिणामही दिसून आला. उत्तर पूर्व दिल्लीत पी एम मोदींच्या पहिल्या रॅलीनंतरच भाजपला यश मिळण्याची शक्यता वाटत होती. दोन महिन्यांच्या प्रचाराच्या काळात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. अनेक वेळा तर आप नेत्यांनी आक्रमक प्रचार करत भाजपला बॅकफुटवर ढकलले.

Elections Results : राजस्थानात वारं फिरलं? भाजपला फक्त 14 जागांची आघाडी; काँग्रेसची टक्कर

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक आणि सुनीता केजरीवाल यांचा प्रचार यांमुळे त्यांच्या बाजूने सहानुभूती तयार होते की काय याची भीती भाजपला वाटत होती. आता या राजकारणाला शह देण्यासाठी काय करावं याचं उत्तर भाजप नेत्यांना काही केल्या मिळत नव्हतं. आम् आदमी पार्टीच्या या पॉलिटिक्सला उत्तर देण्यासाठी मग भाजपने बांसुरी स्वराज आणि कमलजीत सहरवात यांना मैदानात उतरवले.

जेल का जवाब व्होट ही घोषणा सुद्धा भाजपला जड जात होती. पण जसं स्वाती मालीवालचं प्रकरण उजेडात आलं भाजपने ही संधी सोडली नाही. यातील राजकारण ओळखत लगेच आम् आदमी पार्टीवर जोरदार प्रहार करण्यास सुरुवात केली. भाजप महिला नेत्या आणि कार्यकर्त्यांना आंदोलनासाठी मोकळीक देण्यात आली.

लोकसभा निवडणुकीसाठी दिल्लीत आप आणि काँग्रेस यांच्यात आघाडी झाल्याने भाजप नेते थोडे उदासीन झाले होते. मात्र यानंतर काँग्रेस नेते अरविंदर सिंह लवली यांचा राजीनामा आणि भाजप प्रवेश पक्षाच्या बाजूने वातावरण निर्माण करण्यास उपयुक्त ठरला. जेलमधून जामिनावर सुटका झाल्यानंतर कसलेल्या राजकारण्या प्रमाणे प्रचारात उतरले होते. त्यांना घेरण्यासाठी भाजपने योगी आदित्यनाथ यांच्यासह भाजपशासित राज्यांतील मुख्यमंत्र्यांना दिल्लीत आणले.

Loksabha Election Result : भाजप न हारले न जिंकले; 400 पारची गणितं कुठे आणि कशी चुकली?

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव प्रदेश भाजप कार्यालयात वॉर रूम सांभाळत होते. राजनाथ सिंह, नितीन गडकरी यांच्या सारख्या नेत्यांनी आप आणि काँग्रेसवर जोरदार टीका केली होती. भाजपने फक्त सोशल मीडियावरच आपला घेरले नाही तर दुपारच्या रणरणत्या उन्हात जनसभा, रॅली, घर घर संपर्क अभियान सुरू करण्यात आले.

राजस्थानातही भाजपला काँग्रेसचा दे धक्का.. 

राज्यातील 25 जागांपैकी फक्त 14 जागांवर भाजपला आघाडी मिळाली आहे तर आठ जागांवर काँग्रेसला आघाडी मिळाली आहे. राजस्थानात भाजप आणि काँग्रेस याच्यात अटीतटीची लढाई सुरू आहे. भाजपला फक्त 14 जागांवर आघाडी मिळाली आहे तर काँग्रेसने 9 जागांवर आघाडी घेतली आहे. भाजपासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. अन्य तीन जागांवर सीपीआय (एम) आणि बाप पक्षाचे उमेदवार आघाडीवर आहेत. याआधी भाजप 14 जागांवर आघाडीवर होता.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज