उत्तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा जलवा; भाजपला-शिंदेंना सहा जागांचा फटका

उत्तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा जलवा; भाजपला-शिंदेंना सहा जागांचा फटका

Elections Results 2024 : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी झाल्यानंतर राज्यातील निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. या निकालाने महाराष्ट्रात महायुतीसह भाजपाची दाणादाण उडाली. विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र सगळीकडेच महायुतीची पिछेहाट झाली. उत्तर महाराष्ट्रात तर महायुतीच्या हातातून सहा मतदारसंघ निसटले. जळगाव आणि रावेर या दोन मतदारसंघांनी नामुष्की थोडीफार टाळली. या व्यतिरिक्त नंदूरबार, धुळे, नाशिक, नगर दक्षिण, शिर्डी, दिंडोरी या मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांचा दणदणीत पराभव झाला. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात महायुतीचं वर्चस्व आता संपुष्टात आलं आहे असं म्हणण्यास हरकत नाही.

नंदूरबारमध्ये हिना गावितांची हॅट्ट्रीक हुकली

नंदूरबार मतदारसंघात भाजपाच्या विद्यमान खासदार हिना गावित यांना पराभवाचा धक्का बसला. येथे काँग्रेस नेते केसी पाडवी यांचे पुत्र डॉ. गोवाल पाडवी विजयी झाले आहेत. येथील अटीतटीच्या लढतीत पाडवी यांनी बाजी मारली. नंदूरबार जिल्ह्यात आजमितीस काँग्रेसचे दोन आमदार आहेत. तीन भाजपचे तर एक अपक्ष आमदार आहे. अक्कलकुवा मतदारसंघात काँग्रेसचे केसी पाडवी, नवापूरमध्ये शिरीषकुमार नाईक आमदार आहेत. शहादामध्ये राजेश पाडवी, नंदूरबारमध्ये विजयकुमार गावित, शिरपूरमध्ये काशीराम पावरा भाजपचे आणि साक्री मतदारसंघात मंजुळा गावित अपक्ष आमदार आहेत.

या मतदारसंघात आदिवासी समाजाची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे निवडणुकीत या समाजाची मते निर्णायक ठरतात. नंदूरबारमध्ये 2014 च्या मोदी लाटेत भाजप विजयी झाला. या मतदारसंघात रोजगाराचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे येथील नागरिक कामाच्या शोधासाठी शेजारच्या गुजरात राज्यात जातात. येथील दुर्गम भागात आजही आरोग्य सुविधा मिळत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. 2014 च्या निवडणुकीत डॉ. हिना गावित यांना 5,79,486 मते मिळाली होती. तर माणिकराव गावित यांना 4,72,581 मते मिळाली होती. त्यानंतर 2019 च्या निवडणुकीत हिना गावित 6,39,136 मते घेत विजयी झाल्या होत्या. या निवडणुकीत केसी पाडवी यांना 5,43,504 मते मिळाली होती.

धुळ्यात काँग्रेसच्या बच्छाव होणार खासदार

धुळे लोकसभा मतदारसंघातही अटीतटीची लढत पाहण्यास मिळाली. येथे विद्यमान खासदार सुभाष भामरे यांनी विजयाची हॅट्ट्रीक साधता आली नाही. महाविकास आघाडीच्या डॉ. शोभा बच्छाव यांनी जोरदार टक्कर देत विजय खेचून आणला. सन 2019 मधील निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने सुभाष भामरे यांना उमेदवारी दिली होती. काँग्रेसकडून कुणाल पाटील रिंगणात होते. तर आमदार अनिल गोटे अपक्ष उमेदवार होते.

Solapur Loksabha : अखेर सोलापुरकरांनी बीडचं पार्सल पाठवलं! प्रणिती शिंदे खासदार बनल्या…

या निवडणुकीची सूत्रे भाजपने गिरीश महाजन यांच्या हातात दिली होती त्यामुळे गोटे नाराज झाले होते. त्यावेळी त्यांनी आमदारकीचा राजीनामा देत अपक्ष म्हणून रिंगणात उडी घेतली होती. परंतु तरीही विजय खेचून आणण्यात भामरे यशस्वी ठरले होते. या निवडणुकीत एकूण 19,04,859 इतकं मतदान झालं होतं. यामध्ये धुळे ग्रामीण 2,28,112, धुळे शहर 1,54,975, शिंदखेडा 1,86,289, मालेगाव मध्य 1,43,295, मालेगाव बाह्य 1,90,033 आणि बागलाणमध्ये 1,77,044 इतकं मतदान झालं होतं.

2014 च्या निवडणुकीत काँग्रेसने अमरीश पटेल यांना मैदानात उतरवल होतं. या निवडणुकीत एकूण 58.68 टक्के मतदान झालं होतं. या निवडणुकीत एकूण 16,43,720 इतकं मतदान झालं होतं. यामध्ये धुळे ग्रामीण 3,32,378, धुळे शहर 2,35,709, शिंदखेडा 2,94,617, मालेगाव मध्य 2,32,103, मालेगाव बाह्य 2,42,409, बागलाण 2,36,514 असे मतदान झालं होतं.

रावेरमध्ये रक्षा खडसेंनी बाजी मारली

निवडणुकीआधी रावेर मतदारसंघात अनेक घडामोडी घडल्या होत्या. त्यामुळे या मतदारसंघाकडे राज्याचे लक्ष लागले होते. तरीही भाजपने रक्षा खडसे यांना उमेदवारी दिली होती. यात एक चांगली गोष्ट म्हणजे एकनाथ खडसेंनी शरद पवार गटाला सोडचिठ्ठी देत भाजपाच्या उमेदवाराचा प्रचार केला. त्याचा फायदा भाजपला झाला. येथे रक्षा खडसे विजयी झाल्या. येथे महाविकास आघाडीच्या श्रीराम पाटील यांना उमेदवारांनी नाकारलं.

2019 मध्ये काय घडलं होतं ?

सन 2019 मधील निवडणुकीत रक्षा खडसे 3 लाख 35 हजार 882 मताधिक्याने विजयी झाल्या होत्या. त्यांना एकूण 6 लाख 55 हजार 386 मते मिळाली होती. त्यांच्या विरोधातील काँग्रेस उमेदवार डॉ. उल्हास पाटील यांना 3 लाख 19 हजार 504 मते मिळाली होती. तसेच वंचित बहुजन आघाडीच्या नितीन कांदेलकर यांना 88 हजार 365 मते मिळाली होती.

रावेर लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. यामध्ये रावेर-यावलमध्ये काँग्रेसचे शिरीष चौधरी, मुक्ताईनगर-बोदवड मतदारसंघात शिंदे गटाचे चंद्रकांत पाटील, चोपडा मतदारसंघात लता सोनवणे, भुसावळ मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे संजय सावकारे, जामनेरमध्ये भाजपचे गिरीश महाजन तसेच मलकापूर-नांदुरा मतदारसंघात काँग्रेसचे राजेश एकाडे आमदार आहेत. येथील चोपडा, जामनेर या दोन मतदारसंघांचा अपवाद वगळता सर्व मतदारसंघात लेवा पाटीदार समाज निर्णायक आहे. त्याखालोखाल मराठा समाजाची ताकद आहे.

तिरंगी लढतीत नाशकात शिंदेंचा खासदार पडला

नाशिक लोकसभा मतदारसंघात यंदा तिरंगी लढत पाहण्यास मिळाली. विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे यांनी पराभवाचा धक्का दिला. शांतिगिरी महाराज अपक्ष म्हणून रिंगणात होते. त्यांच्या उमेदवारीचा फटका महायुतीला बसला. अटीतटीच्या लढतीत हेमंत गोडसेंची खासदारकीची हॅट्ट्रीक हुकली. उत्तर महाराष्ट्रातील हक्काची जागा महायुतीच्या हातून निसटली.

खासदारकी गमावली! नवनीत राणांनी नेमक्या कोणत्या गोष्टी हलक्यात घेतल्या?

याआधी नाशिक मतदारसंघात 2014 आणि 2019 या दोन्ही निवडणुकीत हेमंत गोडसे विजयी झाले होते. 2019 मध्ये गोडसेंना 5,63,599 मते मिळाली होती. राष्ट्रवादीच्या समीर भुजबळ यांना 2,71,395 मते मिळाली होती. नाशिक मतदारसंघात यंदा नाशिक पूर्व – 55.38 टक्के, नाशिक मध्य – 57.15 टक्के, नाशिक पश्चिम – 54.35 टक्के, देवळाली – 62.05 टक्के, इगतपुरी-त्र्यंबकेश्वर – 72.24 टक्के, सिन्नर – 69.50 टक्क्यांसह मतदारसंघात एकूण 60.75 टक्के मतदान झालं होतं.

नगरमध्ये तुतारी वाजली, चुरशीच्या लढतीत लंके विजयी

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात झालेल्या अटीतटीच्या लढतीत अखेर तुतारी वाजली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांनी महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांच्यापेक्षा जवळपास 31 हजार मतांची आघाडी घेतली. या मतदारसंघात चांगलीच चुरस रंगली होती. अनेक फेऱ्यात विखे आणि लंके यांच्यात अटीतटीची लढत झाली पण अखेर नीलेश लंके यांनी विजयी झाले.

नगर लोकसभा मतदारसंघात 2019 च्या निवडणुकीत 64.79 टक्के मतदान झालं होतं. यंदा 66.61 टक्के मतदान झाले. म्हणजेच यंदा मतदानात 1.82 टक्के वाढ झाल्याचे दिसून आले. पारनेर मतदारसंघात 70.13 टक्के, राहुरीत 70 टक्के, श्रीगोंद्यात 67.90 टक्के, कर्जत-जामखेडमध्ये 66.19 टक्के, शेवगावात 63.03 टक्के आणि नगर शहर मतदारसंघात 62.50 टक्के इतके मतदान झाले आहे.

पक्षीय बलाबलाचा विचार केला तर नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे चार, भाजप 2 आणि विधानपरिषदेवर भाजपचा एक असे आमदार आहेत. येथे राष्ट्रवादीची ताकद जास्त आहे. पारनेरमध्ये निलेश लंके, राहुरीत प्राजक्त तनपुरे, श्रीगोंद्यात भाजपचे बबनराव पाचपुते, कर्जत-जामखेडात रोहित पवार, शेवगाव-पाथर्डीत भाजपाच्या मोनिका राजळे आणि नगर शहरात अजित पवार गटाचे संग्राम जगताप आमदार आहेत.

2019 च्या निवडणुकीत सुजय विखे यांना 7,04,660 मते मिळाली होती तर संग्राम जगताप यांना 4,23,186 मते मिळाली होती. या निवडणुकीत सुजय विखे तब्बल 2,81,526 इतक्या मताधिक्याने विजयी झाले होते. यंदा मात्र विखेंना विजयी वाटचाल कायम राखता आली नाही. निलेश लंकेंनी टफ फाईट देत विजय खेचून आणला. विखेंचा हा पराभव भाजप आणि महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

शिर्डीत ठाकरेंची मशाल पेटली

शिर्डी लोकसभा मतदारसंघात यंदा तिरंगी लढत होती. या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या एन्ट्रीने निवडणूक तिरंगी झाली होती. या तिरंगी लढतीत ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाकचौरे विजयी झाले. महायुतीचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांना पराभवाचा धक्का बसला.  सन 2014 मध्ये तत्कालीन खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी काँग्रेसनं त्यांना तिकीट दिलं होतं. वाकचौरेंनी पक्ष सोडल्याने शिवसेनेनं मग सदाशिव लोखंडे यांना उमेदवारी दिली. त्यानंतर मोदी लाटेत अवघ्या सोळा दिवसात लोखंडे खासदार झाले.

Pune Loksabha : पुण्याची जागा भाजपचीच! बापटांनंतर मोहोळांच्या हाती कमान, धंगेकरांचा पराभव

सन 2019 मधील लोकसभा निवडणुकीच्या मागे पुढे विखे पिता पुत्र भाजपमध्ये आले. यानंतरही शिवसेनेने पुन्हा लोखंडे यांनाच खासदारकीचं तिकीट दिलं. त्यांच्या विरोधात काँग्रेसने श्रीरामपूरचे तत्कालीन आमदार भाऊसाहेब कांबळे यांना तिकीट दिलं. मात्र या वेळेसही लोखंडे विजयी झाले होते. यंदा लोखंडेंबाबत लोकांत जास्त नाराजी होती. त्याचा फटका त्यांना बसल्याचे सांगितले जात आहे.

शिर्डी लोकसभा मतदारसंघात अकोले, संगमनेर, शिर्डी, कोपरगाव, श्रीरामपूर आणि नेवासा विधानसभा मतदारसंघ आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीचे प्रत्येकी तीन आमदार आहेत. अकोले मतदारसंघात अजित पवार गटाचे डॉ. किरण लहामटे, संगमनेरात काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, शिर्डीत भाजपचे राधाकृष्ण विखे पाटील, कोपरगावात अजित पवार गटाचे आशुतोष काळे, श्रीरामपुरात काँग्रेसचे लहू कानडे तर नेवासा विधानसभा मतदारसंघात शंकरराव गडाख आमदार आहेत.

आताच्या निवडणुकीत अकोलेत 1,55,930, संगमनेरात 1,84,031, शिर्डीत 1,78,716, कोपरगावात 1,71,059, श्रीरामपुरात 1,93,605 आणि नेवासा विधानसभा मतदारसंघात 1,73,957 असे एकूण 10,57,298 मतदान झाले होते.

नाराजीनंतरही भाजपनं जळगाव राखलं

मागील वीस वर्षांपासून जळगावात भाजपाचा खासदार आहे. यंदा ठाकरे गटाने करण पवार यांना तर भाजपाने स्मिता वाघ यांना तिकीट दिलं होतं. या मतदारसंघात अटीतटीच्या लढतीत भाजपाच्या स्मिता वाघ निवडून आल्या. ठाकरे गटाचे करण पवार यांना पराभवाचा धक्का बसला. जळगावमध्ये जळगाव शहर, अमळनेर, पाचोरा, एरंडोल, चाळीसगाव आणि जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघ आहेत. जळगाव आणि चाळीसागावात भाजपाचे आमदार आहेत. अमळनेरमध्ये अजित पवार गटाचा आमदार आहे. तसेच जळगाव ग्रामीण, पाचोरा आणि एरंडोलध्ये शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहेत.

सन 2019 मध्ये उन्मेष पाटील यांनी भाजपकडून निवडणूक लढली होती. त्यांना या निवडणुकीत 7,13,874 इतकी मते मिळाली होती. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे गुलाबराव देवकर यांना 3,02,257 आणि वंचित बहुजन आघाडीच्या अंजली बाविस्कर यांना 37,366 मते मिळाली होती. जळगावात भाजपने यंदा विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांचा पत्ता कट करत स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली. त्यामुळे उन्मेष पाटील यांनी भाजप नेतृत्वाला आपली राजकीय ताकद दाखवून दिली.

उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश केला. पाटील यांच्याबरोबर भाजपला सोडचिठ्ठी दिलेले करण पवार यांना तिकीट मिळवून दिले. उन्मेष पाटील यांनी करण पवारांना पाठिंबाही दिला. भाजपाच्या माजी आमदार स्मिता वाघ यांच्याबाबतही मतदारसंघात नाराजी दिसून आली. उन्मेष पाटील, एटी पाटील, माजी आमदार सतीश पाटील आणि गुलाबराव देवकर या दिग्गज नेत्यांना करण पवार यांच्यासाठी प्रचार केला तर आमदार सुरेश पाटील, मंगेश चव्हाण यांनी स्मिता वाघ यांच्यासाठी प्रचार केला.

जळगाव मतदारसंघात यंदा 2019 च्या तुलनेत मतदान वाढले. 2019 मध्ये येथे 56.11 टक्के मतदान झालं होतं तर यंदा 57.70 टक्के मतदान झालं. यामध्ये जळगाव शहर 52.90 टक्के, जळगाव ग्रामीण 62.60 टक्के, अमळनेर 55.94 टक्के, एरंडोल 61.76 टक्के, चाळीसगाव 55.01 टक्के आणि पाचोरा विधानसभा मतदारसंघात 59.82 टक्के इतकं मतदान झालं होतं.

Lok Sabha Election Result: अभिनेत्री नव्हे खासदार म्हणा! कंगना रणौतचा मंडी मतदार संघातून मोठा विजय

दिंडोरीत भास्कर भगरेच खासदार, भारती पवार पराभूत

दिंडोरी मतदारसंघात मोठा उलटफेर झाला. या मतदारसंघात विद्यमान खासदार आणि आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांचा पराभव झाला. महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे विजयी झाले. दिंडोरी मतदारसंघात यंदा 66.75 टक्के इतकं मतदान झालं होतं. 2019 मधील निवडणुकीत 65.65 टक्के मतदान होतं. म्हणजेच यंदा मतदानात 1.01 टक्का वाढ झाली. मतदानाचा हा वाढलेला टक्का भारती पवारांना झटका देणारा ठरला.

नांदगाव विधानसभा मतदारसंघात 58.24 टक्के, कळवणमध्ये 70.89 टक्के, चांदवडमध्ये 66.65 टक्के, येवल्यात 65.38 टक्के, निफाडमध्ये 64.31 टक्के तर दिंडोरीत 75.42 टक्के इतकं मतदान झालं. यामध्ये विशेष गोष्ट म्हणजे भारती पवार यांच्या कळवण तालुक्यात 70.89 टक्के मतदान झालं. मागील वेळी हाच आकडा 72.62 टक्के होता. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांच्या दिंडोरी मतदारसंघात 75.42 टक्के मतदान झालं. मागील वेळी हा आकडा 69.05 टक्के असा होता. म्हणजेच यंदा मतदानात 5.92 टक्के वाढ झाली. आता हाच वाढलेला टक्का निर्णायक ठरला असे सांगण्यात येत आहे.

पक्षीय बलाबल पाहिले तर दिंडोरीच्या सहाही विधानसभा मतदारसंघात महायुतीचे वर्चस्व आहे. दिंडोरी पेठ मतदारसंघात अजित पवार गटाचे नरहरी झिरवळ आमदार आहेत. तसेच निफाडमध्ये अजित पवार गटाचेच दिलीप बनकर, चांदवडमध्ये भाजपचे डॉ. राहुल आहेर, नांदगावात शिंदे गटाचे सुहास कांदे, कळवण-सुरगणात अजित पवार गटाचे नितीन पवार आणि येवला मतदारसंघात अजित पवार गटाचे छगन भुजबळ आमदार आहेत. म्हणजेच या मतदारसंघात अजित पवार गटाचे चार तर शिंदे गट आणि भाजपाचा प्रत्येकी एक आमदार आहे. महायुतीच्या या आमदारांची ताकद असतानाही भारती पवार पराभूत ठरल्या.

या मतदारसंघाचा इतिहास पाहिला तर 2009 मध्ये मतदारसंघ पुनर्रचनेत दिंडोरी मतदारसंघ अस्तित्वात आला. आधी मालेगाव मतदारसंघ असताना येथे काँग्रेसचे वर्चस्व होते. या मतदारसंघात झागरू मंगळू कहांडोळ यांनी सर्वाधिक वेळा प्रतिनिधीत्व केले. जनता दलाचे हरिभाऊ महाले तीनदा निवडून आले होते. भारतीय जनता पार्टीचे हरिश्चंद्र चव्हाण एक टर्म मालेगावचे आणि दिंडोरी मतदारसंघ अस्तित्वात आल्यानंतर दोन वेळा दिंडोरीचे खासदार राहिले. आता या मतदारसंघावर भाजपाचे वर्चस्व आहे.

2019 मधील लोकसभा निवडणुकीत एकूण 11 लाख 34 हजार 754 मतदारांनी मतदान केलं होतं. यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या डॉ. भारती पवार यांना 5,62,452 तर काँग्रेसचे धनराज महाले यांना 3,68,111 मते मिळाली होती. माकपाच्या जेपी गावितांना 1,94,95 तर वंचितच्या बापू बर्डे यांना 58,847 मते मिळाली होती. या चौरंगी लढतीत भास्कर भगरे विजयी झाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज