खासदारकी गमावली! नवनीत राणांनी नेमक्या कोणत्या गोष्टी हलक्यात घेतल्या?

खासदारकी गमावली! नवनीत राणांनी नेमक्या कोणत्या गोष्टी हलक्यात घेतल्या?

Loksabha Election 2024 : अमरावतीमध्ये भाजपच्या उमेदवार नवनीत राणा (Navneet Rana) यांचा दणदणीत पराभव झाला. नवनीत राणांचा काँग्रेसचे उमदेवार बळवंत वानखडेंनी (Balwant Wankhade) पराभव केला. मतमोजणी सुरू झाल्यानंतर कधी नवनीत राणा तर कधी बळवंत वानखडे आघाडीवर होते. मात्र, अखेर वानखडेंनी राणांना पराभवाची धूळ चारली. दरम्यान, नवनीत राणांच्या पराभवाची काय कारणं आहेत? याच विषयी जाणून घेऊ.

Solapur Loksabha : अखेर सोलापुरकरांनी बीडचं पार्सल पाठवलं! प्रणिती शिंदे खासदार बनल्या… 

राणांची मते बूब यांच्याकडे वळाली
सायंकाळी साडेसहा वाजतेपर्यंत निवडणुक आयोगाने दिलेल्या आकडेवारीनुसार, बळवंत वानखडेंना 5 लाख 20 हजार 149 मते मिळाली आहेत. तर नवनीत राणांचा 18495 मतांनी पराभव झाला आहे. तर प्रहारचे उमेदवार दिनेश बुब यांना 83942 मते मिळाली आहेत. बच्चू कडूनी राणा दाम्पत्याला धडा शिकवायचा निमित्ताने प्रहारकडून बूब यांना उमेदवारी दिली. या निवडणुकीत भाजपला जाणारी मतं बुब यांना मिळाल्यानं राणांचा पराभव झाला.

Solapur Loksabha : अखेर सोलापुरकरांनी बीडचं पार्सल पाठवलं! प्रणिती शिंदे खासदार बनल्या… 

राणांनी भूमिका बदलल्याने फटका
अनेक वादग्रस्त विधानांमुळे राणा दाम्पत्य राज्यभर चर्चेत आलं होतं. 2019 मध्ये मोदींविरोधात बोलणाऱ्या नवनीत राणा यांनी आपली भूमिका बदलली आणि मोदींचा गवगवा सुरू केला. परिणामी, जनमत राणांविरोधात गेलं. त्याचा फटका त्यांना बसल्याची चर्चा आहे.

मुस्लिमांची मते मिळवण्यात राणांना अपयश
अमरावती लोकसभा मतदारसंघात मुस्लिम, आदिवासी आणि दलित मते निर्णायक आहेत. आतापर्यंत्या इतिहासानुसार, दलित आणि आणि मुस्लिमाचं एकगठ्ठा मतदान कॉंग्रेसच्या पारड्यात पडतं. हे मतदान आपल्याकडे वळवण्यात राणा अपयशी ठरल्या. त्यामुळं राणांचा पराभव झाला.

अंतर्गत विरोध भोवला
भाजप आणि शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांचा छुपा विरोध केला. राणा दाम्पत्यांनी मागच्या पाच वर्षांच्या काळात अमरावतीतील महायुतीतील जवळपास सर्वच प्रमुख नेत्यांसोबत वाकडे घेतले. भाजपचे स्थानिक स्वराज्य संस्थेतील आमदार प्रविण पोटे पाटील आणि राणा दम्पत्याचे फारसे जमत नाही. त्यामुळं भाजप नेत्यांनी नवनीत राणांचा प्रचार केला नसल्याचं बोलल्या जातं. याचाही फटका राणांना बसला.

नवनीत राणांचा पराभव करण्यासाठी कॉंग्रेसची यंत्रणेनं जोरदार प्रयत्न केलं. कॉंग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर, सुलभा खोडके यांनीही नवनीत राणांच्या पराभव ताकद लावल्यानं अनेक मतदारसंघात राणांना अल्प मतं मिळाली.

बडनेऱ्यात मतदान कमी झाल्याने खासदारकी हुकली
नवनीत राणा यांचा पराभव होण्याचं आणखी एक कारण म्हणजे, त्यांना बडनेरा मतदारसंघात झालेलं कमी मतदान. हाच मतदारसंघ रवी राणा यांचा बालेकिल्ला समजला जातो. इथून ते मागच्या तीन टर्मपासून आमदार आहेत. गतवेळीही नवनीत राणांना इथून आघाडी मिळाली नव्हती. यंदा इतर मतदारसंघांमधील परिस्थिती पाहता बडनेरामधून आघाडी मिळविण्याचा राणांचा प्रयत्न होता. मात्र मतदानच कमी झाल्याने त्यांची खासदार होण्याची संधी हुकली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube